मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /PUBG गेम आता नव्या नावानं परतला; प्री-रजिस्ट्रेशन सुरू, कसं कराल?

PUBG गेम आता नव्या नावानं परतला; प्री-रजिस्ट्रेशन सुरू, कसं कराल?

मॉर्टल कॉम्बेट गेम तयार करणाऱ्या दक्षिण कोरियाची (South Korea) कंपनी क्राफ्टन इंककडून 6 मे रोजी सोशल मीडियावर भारतामध्ये परतत असल्याचे जाहीर केले आहे. 18 मे पासून प्री-रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे.

मॉर्टल कॉम्बेट गेम तयार करणाऱ्या दक्षिण कोरियाची (South Korea) कंपनी क्राफ्टन इंककडून 6 मे रोजी सोशल मीडियावर भारतामध्ये परतत असल्याचे जाहीर केले आहे. 18 मे पासून प्री-रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे.

मॉर्टल कॉम्बेट गेम तयार करणाऱ्या दक्षिण कोरियाची (South Korea) कंपनी क्राफ्टन इंककडून 6 मे रोजी सोशल मीडियावर भारतामध्ये परतत असल्याचे जाहीर केले आहे. 18 मे पासून प्री-रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे.

नवी दिल्ली, 18 मे :  लोकप्रिय मोबाइल गेम प्लेयर अननोन बैटलग्राउंड्स म्हणजेच पबजी (PUBG) नऊ महिन्यांनंतर पुन्हा भारतात परतत आहे. नवे नियम, नवा अवतार आणि नव्या नावासह ही गेम भारतात पुन्हा येत आहे. टाइटल आहे- बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया. या मॉर्टल कॉम्बेट गेम तयार करणाऱ्या दक्षिण कोरियाची (South Korea) कंपनी क्राफ्टन इंककडून 6 मे रोजी सोशल मीडियावर भारतामध्ये परतत असल्याचे जाहीर केले आहे. 18 मे पासून प्री-रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. जूनमध्ये ही गेम ऑफिशियली लॉन्च होण्याची शक्यता आहे. या गेमसाठी जे प्री-रजिस्ट्रेशन करतील त्यांना कंपनी रिवॉर्ड्स देणार आहे.

प्री-रजिस्ट्रेशन कुठं कराल?

  • ही गेम एंड्रॉइड आणि iOS या दोन्ही ऑपरेटींग सिस्टमसाठी उपलब्ध होणार आहे. 18 मे रोजी गुगल प्ले स्टोअरवर यासाठी प्री-रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. अॅपलच्या अॅप स्टोरवर बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशनची तारीख नंतर घोषित होणार आहे.
  • Hacking आणि Online Fraud पासून करा तुमच्या Smartphoneचा बचाव,पाहा सोप्या ट्रिक्स
  • प्री-रजिस्टर करण्यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जा, त्यानंतर बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया गेम या नावानं सर्च करा. त्यानंतर 18 मे रोजी त्यावर उपलब्ध ‘प्री-रजिस्टर’ बटनावर क्लीक करून रजिस्ट्रेशनशी संबंधित सर्व माहिती भरावी लागेल.
  • ही गेम खेळण्यासाठी मोफत उपलब्ध असणार आहे, पण इन-अॅप पर्चेजमध्ये स्किन, वेपन्स किंवा अन्य एक्सेसरीज खरेदी करण्यासाठी पर्याय असेल. हे अगोदरच्या पबजी सारखंच असणार आहे. प्री-रजिस्ट्रेशन करणाऱ्यांना गेम लॉन्च झाल्यानंतर यूसी (अॅपमध्ये कपड़े, वेपन्स विकत घेण्यासाठी लागणारी कॅश), कपड़े, स्किन याशिवाय काही गोष्टी रिवॉर्ड म्हणून मिळतील.
  • PUBG ची पेक्षा काहीसा वेगळा असेल बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया?

    • आत्तापर्यंत हे पूर्णपणे स्पष्ट होऊ शकलेले नाही की क्राफ्टच्या माहितीनुसार हा गेम फक्त भारतासाठीच असले की कसे? बाहेरील देशातील लोक यामध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत आणि भारतीय खेळाडूंचा विदेशी खेळाडूंशी मुकाबला होऊ शकणार नाही.
    • 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हा गेम खेळायला मिळणार नाही, ते आपल्या आई-वडिलांच्या मोबाइलवरूनच खेळू शकतील. मात्र, हे स्पष्ट नाही की गेमकडून वापरकर्त्यांचं वय कशा पद्धतीनं तपासलं जाईल.
    • गेममध्ये पबजी मोबाइल पेक्षा बरेच काही बदल करण्यात आले आहेत. गेम खेळताना जे मॅकेनिक्स वापरले जातील ते वेगळे असणार आहेत. यूजर 7,000 रुपयांपेक्षा अधिक पैशांचे ट्रांजेक्शन या अॅपवरून करू शकणार नाही.
    • पबजी मोबाइल इंडियाच्या तुलनेत यामध्ये हिंसा कमी असणार आहे. बॅटलग्राउंड मोबाइल इंडियामध्ये कोणताही ब्लड इफेक्ट असणार नाही. म्हणजे खून-मारामारी नक्कीच असणार पण रक्त वैगेर दिसणार नाही. एक दिवसात जास्तीत जास्त 3 तासांचा प्लेट टाईम उपलब्ध असेल.
    • बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडियाचा स्वत:चा ईस्पोर्ट्स इकोसिस्टम, लीग आणि टूर्नामेंट्स असणार आहेत. कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, या गेममध्ये भारताचा विचार करून इवेंट्स, गेमप्लेस कॅरेक्टर तयार केले आहेत. जास्तीत-जास्त यूजर-फ्रेंडली तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.
    • पबजी मोबाइलसारखे सॅनहोक मॅपसारखे लोकेशन दिसेल, क्राफ्टनकडून सोशल मीडिया जे फोट शेअर केले आहेत, ते PUBG मधील सॅनहोकमधील बॅन ताई परिसरातील आहेत. हा एक डॉक आहे, जिथे पबजीमध्ये खेळाडू चांगलीच लूट करू शकत होते. यावरून अंदाज येत आहे की, बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडियाचा मॅपही पबजी मोबाइलसारखाच असेल.
    • क्राफ्टकडून कंटेंट क्रिएटर्सद्वारे सांगण्यात आले आहे की, बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडियाविषयी चर्चा करताना पबजी मोबाइलचे नाव घेतले जावू नये. या दोन्हींची तुलना व्हावी असं कंपनी असं कपनीला वाटत नाही. मॅप्स एकसारखेच असले तरी हे निश्चित नाही कि ऩाव एकसारखेच असेल किंवा नाही, सॅनहोक, विकेंडी, मीरामर आणि एरांगेल मॅप्सही यावर दिसू शकतात.

First published:

Tags: PUBG, Pubg game