• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • BSNL चा जबरदस्त प्लॅन; परवडणाऱ्या किंमतीत 81 दिवसांपर्यंत 1 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही

BSNL चा जबरदस्त प्लॅन; परवडणाऱ्या किंमतीत 81 दिवसांपर्यंत 1 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही

BSNL च्या 429 रूपयांच्या (BSNL 429 rs plan with plan data and Unlimited Calling) प्लॅनची नेहमीच चर्चा होत असते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : सरकारी टेलीकॉम कंपनी असलेल्या Bharat Sanchar Nigam Limited (BSNL) कडून विविध रिचार्ज प्लॅन्सवर अनेकदा ऑफर दिल्या जातात.  त्यात BSNL च्या 429 रूपयांच्या (BSNL 429 rs plan with plan data and Unlimited Calling) प्लॅनची नेहमीच चर्चा होत असते. या प्लॅनमध्ये 81 दिवसांपर्यंत Data आणि Unlimited Calling ची सुविधा देण्यात येत आहे. असे काही (BSNL Best recharge Plans for Data, SMS and Unlimited Calling) प्लॅन्स आहेत ज्यांची किंमत कमी असून चांगले बेनिफिट्स आहेत.

  गरज पडल्यावर Jio देणार फ्री 5GB डाटा; असं करा Apply

  BSNL तीन महिन्यांचा 429 रूपये प्लॅन जे BSNL चे युजर्स दरमहा 150 रूपयांचा रिचार्ज करतात त्यांच्यासाठी हा प्लॅन फायदेशीर ठरेल. प्रतिमहिना 150 रूपये भरण्यापेक्षा एकदाच तीन महिन्यांसाठी 429 रूपये भरले, तर चांगली बचत होऊ शकते. या रिचार्जवर 81 दिवसांसाठी प्रतिदिवस 1 GB डेटा आणि Unlimited Calling ची सुविधा देण्यात आली आहे.

  आपल्या Smartphone मध्ये नेहमी ठेवा या Apps; हे आहेत फायदे

  मिळणार Eros Now चं सब्सक्रिप्शन - BSNL च्या 429 रूपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना Eros Now चं फ्री सब्सक्रिप्शन देण्यात येत आहे. त्याचबरोबर दिल्ली आणि मुंबई या शहरांसाठी Free roaming ची सुविधाही देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना या रिचार्जवर दुहेरी फायदा होत आहे.

  ही आहे जगातील सर्वात महाग वस्तू, Calculator वरही मावत नाही रकमेचा आकडा

  BSNL चा Broadband प्लॅन - BSNL ग्राहकांना 449 रूपयांच्या रिचार्जवर 3,300 GB इंटरनेट डेटा देत आहे. त्याचा स्पीड 30 Mbps असणार आहे. हा प्लॅन 30 दिवसांसाठी वैध असेल. यात Unlimited free voice calling ची सुविधा देण्यात आली आहे.
  Published by:Atik Shaikh
  First published: