नवी दिल्ली, 16 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये प्रत्येक व्यक्तीला विम्याचा लाभ पोहचवण्यासाठी पंतप्रधान सुरक्षा विमा (PMSBY) योजनेची सुरुवात केली. या योजनेंतर्गत सरकार अतिशय स्वस्त प्रीमियमसह जीवन विमा देते. PMSBY द्वारे, कमी उत्पन्न असणाऱ्या गटातील लोकांनाही विमा योजनेचा लाभ दिला जावा, हा या योजनेमागचा हेतू आहे.
PMSBY विमा योजनेचा वार्षिक प्रीमियम केवळ 12 रुपये असतो, म्हणजेच महिन्याच्या हिशोबाने 1 रुपया महिना प्रीमियम येतो. या योजनेद्वारे लोकांना त्यांच्या कठीण काळात मदत होऊ शकते.
पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत विमाधारकाचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा पूर्णपणे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळतो. काही प्रमाणात अपंगत्व आल्यास, एक लाख रुपयांचा कव्हर मिळतो. केवळ 12 रुपयांत पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेणे संकट काळात कुटुंबासाठी एक आर्थिक सुरक्षा उपलब्ध करतो.
प्रीमियम -
या योजनेचा लाभ 18 ते 70 वर्षापर्यंतचे लोक घेऊ शकतात. योजनेचा फायदा घेण्यासाठी बँक अकाउंट असणं गरजेचं आहे. एकाहून अधिक बँक अकाउंट असल्यास, केवळ एकाच बँकेतून ही योजना घेता येऊ शकते. प्रत्येक वर्षी जूनमध्ये प्रीमियमचा एक हप्ता ऑटो डेबिट सुविधेच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यातून कट केली जाईल.
या योजनेंतर्गत, अपघातात विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत मिळते. तर दुर्घटनेत पूर्णपणे अपंगत्व आल्यास 2 लाखांची आर्थिक मदत मिळते. काही प्रमाणात अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांची मदत मिळते.
पूर्ण अपंगत्व म्हणजे दोन्ही डोळे, दोन्ही हात, पाय गमावणं, एक डोळा हात, पाय गमावण्याच्या स्थितीतही 2 लाखांच्या मदतीची तरतूद आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेसाठी एनरोलमेंट पीरियड 1 जून ते 31 मेपर्यंत असतो.
खात्यात प्रीमियम रिन्यूसाठी पर्याप्त बॅलेन्स नसल्यास, पॉलिसी रद्द होईल. सर्व खातेधारकांनी 31 मे आधी विमा पॉलिसी रिन्यू झाली की, नाही हे तपासणं गरजेचं आहे. बँक खात्यातून विमा प्रीमियम पैसे डेबिट होतात. त्यामुळे बँक खात्यात कमीत-कमी 12 रुपये असणं गरजेचं आहे. या PMSBY योजनेसाठी क्लेम फॉर्म या लिंकवर http://www.jansuraksha.gov.in/Files/PMSBY/Hindi/ClaimForm.pdf डाउनलोड करता येईल. तसंच हिंदीशिवाय इतर भाषांमध्ये फॉर्मसाठी http://www.jansuraksha.gov.in/Forms-PMSBY.aspx या लिंकवर क्लिक करू शकता. तसंच 1800-180-1111/1800-110-001 या टोल फ्री क्रमांकावर माहिती घेऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Insurance