नवी दिल्ली, 11 एप्रिल : आजकाल स्मार्टफोनमध्ये अनेक बनावट मालवेअर अॅप्सद्वारे युजरचा प्रायव्हेट डेटा हॅक करण्याचं प्रमाण वाढलं आहे. हे अॅप्स फ्रीमध्ये सर्विस देण्याच्या नावाने, युजरचा प्रायव्हेट डेटा लीक करतात. सध्या अशा अॅप्सबाबत इशारा देण्यात येत आहे. हे अॅप्स युजर्सच्या व्हॉट्सअॅप मेसेजसवर लक्ष ठेवतात, तसंच व्हॉट्सअॅपचे सर्व नोटिफिकेशनही रीड करतात. एवढंच नाही, तर हे अॅप्स व्हॉट्सअॅपचे मेसेजेस दूर बसलेल्या हॅकर्सकडेही पाठवतात.
मिळालेल्या माहितीनुसार, या अॅपचं नाव FlixOnline आहे, हे अॅप नेटफ्लिक्सचा ग्लोबल कंटेन्ट फ्रीमध्ये दाखवण्यासाठी असल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु यात नेटफ्लिक्सचा कोणताही कंटेन्ट न दाखवता, हा एक Malware असून नेटफ्लिक्स फ्री देण्याच्या नावाने फसवणूक केली जात असल्याचं समोर आलं आहे. हे अॅप व्हॉट्सअॅपवर हेरगिरी करण्यासाठी बनवण्यात आलं आहे.
धोकादायक अॅपकडून होतो ऑटो रिप्लाय -
हे अॅप युजर्सच्या व्हॉट्सअॅपचे सर्व मेसेज वाचतो आणि हे मेसेज रिमोटली हॅकर्सकडे पाठवले जातात. मेसेजसह हे अॅप युजरच्या फोनची माहिती देण्यासंदर्भातही लिंक पाठवतं. तसंच व्हॉट्सअॅपचे सर्व नोटिफिकेशनवरही कंट्रोल करतो, आणि अनेकदा मेसेजला ऑटो रिप्लायही केला जातो, याबाबत युजरला कोणतीही माहिती मिळत नाही. हे अॅप इन्स्टॉल होताना, तुमच्याकडून अनेक प्रकारच्या परमिशन्स मागतं.
दरम्यान, गुगलने हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन हटवलं आहे. परंतु अनेक दिवसांपासून या अॅपची लिंक, हे अॅप व्हायरल होत असून अनेकांनी ते डाउनलोडही केलं आहे. तुम्हीही नेटफ्लिक्स फ्री असल्याच्या संबंधीत कोणतंही अॅप डाउनलोड केलं असल्यास ते त्वरित फोनमधून डिलीट करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.