नवी दिल्ली, 1 डिसेंबर : Flipkart वर टीव्ही डेज सेल (Flipkart TV Days Sale) सुरू झाला आहे. हा सेल 1 डिसेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये Smart TV सर्वात स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. या सेलमध्ये Mi, OnePlus, Realme आणि Samsung च्या स्मार्ट टीव्हीवर धमाकेदार डील्स मिळत आहेत. तुम्ही जुना टीव्ही हटवून नवा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. वर्षाअखेरीस स्मार्ट टीव्हीवर जबरदस्त ऑफर्स मिळत आहेत. या सेलमध्ये Mi चा 32 इंची Smart TV अतिशय स्वस्तात 4 हजार रुपयांत खरेदी करता येईल. काय आहे ऑफर - Mi 4A Pro 32 Inch HD Ready Smart Android TV ची लाँच प्राइज 19,999 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्ट सेलमध्ये टीव्हीवर 20 टक्क्यांचा डिस्काउंट मिळतो आहे. म्हणजेच हा टीव्ही 15,999 रुपयांता उपलब्ध आहे. परंतु बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफरद्वारे टीव्ही आणखी स्वस्तात खरेदी करता येऊ शकतो.
Smartphone चोरी झाल्यास असं सुरक्षित ठेवा PhonePe Account, लगेच करा हे काम
जर तुम्ही अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट करत असाल, तर तुम्हाला 800 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. म्हणजेच स्मार्ट टीव्हीची किंमत 15,199 रुपये होईल. त्यानंतर एक्सचेंज ऑफरही असून याचा वापर केल्यास टीव्हीची किंमत आणखी कमी होईल.
नवी Car घेताय? Zero Down payment मध्ये खरेदी करता येईल 4 लाखांची Maruti Swift
Mi च्या या 4A Pro 32 Inch HD Ready Smart Android TV वर 11 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळते आहे. जर तुम्ही जुना टीव्ही एक्सचेंज करत असाल, तर 11000 रुपये ऑफर मिळेल. परंतु यासाठी तुमचा जुना टीव्ही चांगल्या कंडिशनमध्ये असणं आणि टीव्हीचं मॉडेल लेटेस्ट असणं गरजेचं आहे. जर संपूर्ण ऑफरचा फायदा घेता आला, तर तुम्हाला Mi चा हा स्मार्ट टीव्ही 4,199 रुपयांना खरेदी करता येईल.