मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

नवी Car घेताय? Zero Down payment मध्ये खरेदी करता येईल 4 लाखांची Maruti Swift

नवी Car घेताय? Zero Down payment मध्ये खरेदी करता येईल 4 लाखांची Maruti Swift

सध्या मारुति स्विफ्टचं बेस मॉडेल 6.74 लाख रुपयांत लिस्टेड आहे. परंतु एका डीलमध्ये ही केवळ 4 लाखात खरेदी करता येऊ शकते.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : भारतीय बाजारात मारुति कारसह अनेक प्राइज सेगमेंटमध्ये विविध कार्स उपलब्ध आहेत. अशीच एक कार Maruti Swift Dzire आहे, जी आपल्या कॉम्पॅक्ट डिझाइन आणि चांगल्या बूट स्पेसमुळे लोकप्रिय आहे. सध्या मारुति स्विफ्टचं बेस मॉडेल 6.74 लाख रुपयांत लिस्टेड आहे. परंतु एका डीलमध्ये ही केवळ 4 लाखात खरेदी करता येऊ शकते. त्याशिवाय झिरो डाउन पेमेंटचाही फायदा घेता येईल.

Maruti Swift चं हे DI ABS MANUAL मॉडेल आहे. या डीलच्या मदतीने ही कार झिरो डाउन पेमेंट आणि 9355 रुपयांच्या EMI मध्ये खरेदी करता येईल. वेबसाइटवर या कारची किंमत 4,05,199 रुपये आहे.

...तर नव्या कार खरेदीवर मिळेल बंपर सूट, रजिस्ट्रेशन फीदेखील होईल माफ

काय आहेत फीचर्स -

ही कार डिझेल फ्युलवर काम करते. ही कार 25 किलोमीटर प्रति लीटरचं मायलेज देऊ शकते. त्याशिवाय यात मॅन्युअल गियरबॉक्स देण्यात आला आहे. 5 जण या कारमध्ये बसू शकतात. ही कार rpm वर 74 bhp पॉवर जनरेट करते आणि 2000 rpm वर 190 nm पॉवर जनरेट करू शकते.

केवळ 1.93 लाखात मिळतेय Hyundai ची ही Car, पाहा डिटेल्स

Maruti ची ही 4 लाखात मिळणारी कार Cars24 वर लिस्टेट आहे. ही सेकंड हँड कार असून 2015 चं मॉडेल आहे. आतापर्यंत ही कार 37 हजार किलोमीटर चालली आहे. यावर 2022 नोव्हेंबरपर्यंत इन्शुरन्स मिळतो आहे.

सेलरकडून पोस्ट करण्यात आलेली ही कार चांगल्या कंडिशनमध्ये असून ही फर्स्ट ओनर कार आहे. हरियाणाच्या HR-10 आरटीओमध्ये रजिस्टर्ड आहे. ही कार फेब्रुवारी 2015 मध्ये खरेदी करण्यात आली होती. महत्त्वाची बाब म्हणजे कोणतीही सेकंड हँड कार खरेदी करताना आधी त्याची संपूर्ण माहिती तपासा, त्यानंतर पुढील डील करा.

First published:

Tags: Car, Maruti suzuki cars