जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / तुम्ही किती जोरात घोरता? हे डिव्हाईस सांगेल टक्केवारी, जाणून घ्या काय आहे किंमत आणि फीचर्स

तुम्ही किती जोरात घोरता? हे डिव्हाईस सांगेल टक्केवारी, जाणून घ्या काय आहे किंमत आणि फीचर्स

तुम्ही किती जोरात घोरता? हे डिव्हाईस सांगेल टक्केवारी, जाणून घ्या काय आहे किंमत आणि फीचर्स

आता Fitbit चं स्मार्टवॉच आणि स्मार्टबँड घोरण्याची संपूर्ण माहिती रेकॉर्ड करेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 मे : झोपेत घोरणं ही सामान्य बाब आहे. अनेक लोकांना याची माहितीही नसते, की ते झोपेत घोरतात. घोरणं थांबवण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात, त्यापैकी काही फायद्याचे ठरतात तर काहीचा काहीच उपयोग होत नाही. टेक्नोलॉजीमध्येही अनेक कंपन्या घोरण्यावर लगाम लावण्यासाठी, घोरणं ट्रॅक करण्यासाठी अनेक काळापासून रिसर्च करत आहेत. त्यापैकी स्मार्ट विअरेबल बनवणारी कंपनी Fitbit देखील सामिल आहे. आता Fitbit चं स्मार्टवॉच आणि स्मार्टबँड घोरण्याची संपूर्ण माहिती रेकॉर्ड करेल. Fitbit अ‍ॅपचं 3.42 वर्जन गुगल प्ले स्टोरवर रिलीज झालं आहे, ज्यात स्लिपिंग पॅटर्न अधिक चांगल्या रितीने मॉनिटर करण्याचा दावा करण्यात आला आहे. आता Fitbit अ‍ॅप तुम्ही रात्रीची चांगली झोप घेता की नाही ते सांगू शकेल. नव्या अपडेटनंतर अ‍ॅपमध्ये Snore and Noice Detect चं फीचर मिळेल. हे ऑन केल्यानंतर तुमचा फिटनेस बँड किंवा स्मार्टवॉचचा मायक्रोफोन झोपताना ऑन होईल आणि हाच मायक्रोफोन या गोष्टीची माहिती देईल, की तुम्ही किती जोरात घोरता. कोणी दुसरा व्यक्ती तुमच्या Aadhaar Card चा वापर तर करत नाही ना? असं ओळखा झोपताना Fitbit च्या फिटनेस बँडचा मायक्रोफोन Noice मॉनिटर करेल, ज्यात घोरण्याचा आवाज सामिल असेल. मायक्रोफोनला जसं समजेल, की Noice बेसलाईनहून अधिक आहे, त्यावेळी तो सर्वात आधी हे तपासेल की हा आवाज घोरण्याचा आहे की बाहेरचा आहे. जर तुमच्या खोलीत येणारा आवाज, तुमच्या घोरण्याहून अधिक असेल, तर त्यावेळी हे फीचर काम करणार नाही. बाजूच्या व्यक्तीलाही कळणार नाही तुम्ही WhatsAppवर काय बोलताय!असं लपवा पर्सनल चॅट घोरण्याचा रिपोर्ट Fitbit अ‍ॅप तीन कॅटेगरीमध्ये विभागेल. ज्यात पहिला None to mild आहे. याचा अर्थ झोपताना तुम्ही 10 टक्केच घोरता. Moderate चा अर्थ 10-40 टक्के आणि Frequent चा अर्थ 40 टक्क्यांहून अधिक घोरता. घोरण्याची ही टक्केवारी तुमच्या संपूर्ण झोपेच्या वेळेच्या आधारे निश्चित केली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात