नवी दिल्ली, 19 जानेवारी : सध्या स्मार्टवॉचची (Smartwatch) मोठी क्रेझ आहे. जर तुम्हीही Smartwatch घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. फाय-बोल्टने (Fire-Boltt) भारतात आपलं नवं स्मार्टवॉच Fire-Boltt Ninja 2 Max लाँच केलं आहे. हार्ट रेट आणि SpO2 सेंसरसारखे आवश्यक फीचर्स असलेल्या या स्मार्टवॉचची किंमत 2000 रुपयांहून कमी आहे. हे स्मार्टवॉच कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट आणि Amazon इंडियावरुन खरेदी करता येऊ शकतं.
हे स्मार्टवॉच ब्लॅक, डार्क ग्रीन आणि रोज गोल्ड रंगात उपलब्ध आहे. एकदा फुल चार्ज झाल्यानंतर हे स्मार्टवॉच 7 दिवसांपर्यंत चालू शकत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
काय आहेत Fire-Boltt Ninja 2 Max चे स्पेसिफिकेशन्स -
Smartwatch मध्ये कंपनीने 240x280 पिक्सल रिजॉलूशनसह 1.5 इंची एचडी टचस्क्रिन रेक्टँग्युलर डिस्प्ले दिला आहे. वॉचच्या उजव्या बाजूला नॅविगेशनसाठी एक बटण दिलं आहे. स्मार्टवॉचमध्ये हेल्थ आणि फिटनेस ट्रॅकिंगसाठी अनेक जबरदस्त फीचर्स दिले गेले आहेत. हे स्मार्टवॉच युजरचे हार्ट रेट आणि ब्लॅड ऑक्सिजन लेवल अर्थात SpO2 देखील मॉनिटर करतं. त्याशिवाय स्लीप आणि मेडिटेटिव्ह ब्रिदिंगसाठीही सेंसर देण्यात आले आहेत.
कंपनीचं हे लेटेस्ट स्मार्टवॉच रनिंग, सायकलिंग, वॉकिंग आणि स्विमिंगसारख्या 20 स्पोर्ट्स मोडसह येतं. त्याशिवाय नॉचमध्ये महिलांसाठी पीरियड रिमाइंडर फीचरही देण्यात आलं आहे. एवढंच नाही, तर हे वॉच युजर्सला हवामाननुसार हायड्रेट राहण्याचीही आठवण करुन देतं.
Fire-Boltt Ninja 2 Max मध्ये युजर कॉल, मेसेज आणि सोशल मीडिया नोटिफिकेशन अॅक्सेस करू शकतात. याची खास बाब म्हणजे यात म्यूजिक प्लेबॅक कंट्रोल्ससह रिमोट कॅमेरा शटरही देण्यात आलं आहे. IP68 रेटिंगसह येणाऱ्या या वॉचमध्ये सिंगल बॅटरी असून 7 दिवसांपर्यंत बॅकअप देऊ शकते आणि याचा स्टँडबाय टाइम 25 दिवसांपर्यंत आहे.
Fire-Boltt Ninja 2 Max लेटेस्ट फीचर्ससह असणारं हे जबरदस्त स्मार्टवॉच परवडणाऱ्या किंमतीत आहे. 2000 रुपयांहून कमी किमतीत 1899 रुपयांत Ninja 2 Max Smartwatch खरेदी करता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartwatch, Tech news