भोपाळ, 26 जानेवारी : मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) ऑनलाइन सेलिंग कंपनी अॅमेझॉनच्या (Amazon) सेलरवर FIR दाखल करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या आधी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने तिरंग्याचा चुकीचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अॅमेझॉन प्लॅटफॉर्मवर तिरंगा छापलेले शूज विक्रीप्रकरणी राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
या आदेशांनंतर सहा तासांच्या आत मंगळवारी हबीबगंज येथील रहिवासी शुभम नायडू यांनी अॅमेझॉन कंपनीशी संबंधित विक्रेत्यावर गुन्हे शाखा पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली. FIR दाखल करणारे नायडू एका खासगी कंपनीत काम करतात.
काय आहे प्रकरण -
अॅमेझॉनच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रजासत्ताक दिनानिमित्त सेल जाहीर करण्यात आला. परंतु सेलसह राष्ट्रध्वज छापलेल्या शूजचा फोटो लावण्यात आला होता. सोशल मीडियावर युजरने याप्रकरणी कंपनीविरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
त्यानंतर राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी याप्रकरणी कंपनीविरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. गृहमंत्र्यांनी याप्रकरणी बोलताना अॅमेझॉन कंपनीबाबतची समोर आलेली माहिती अतिशय वेदनादायक असून ती खपवून घेतली जाणार नाही. पोलीस याबाबत योग्य ती कारवाई करतील असं सांगितलं. देशाचा अवमान करणारं कोणतंही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही, असंही ते म्हणाले.
दरम्यान, यापूर्वी ऑनलाइन ड्रग्सचा मुद्दाही राज्यात चर्चेत होता. याप्रकरणी भिंड येथे ऑनलाइन कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याशिवाय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन चाकूच्या होम डिलीव्हरीवर आक्षेप घेत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसंच ऑनलाइन कंपन्यांनी त्यांच्या सोशल प्लॅटफॉर्मवरुन हे हटवलं नाही, तर कारवाई केली जाण्याचं म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amazon, Online shopping, Republic Day