मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Amazon Pay Later: आता शॉपिंग करा, नंतर विना व्याज करा रिपेमेंट

Amazon Pay Later: आता शॉपिंग करा, नंतर विना व्याज करा रिपेमेंट

ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनने (Amazon) यासाठी एक खास सुविधा आणली आहे. 'बाय नाउ पे लेटर' (Buy Now Pay Later) या धर्तीवर अ‍ॅमेझॉनची अ‍ॅमेझॉन पे लेटर (Amazon Pay Later) सुविधा आहे.

ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनने (Amazon) यासाठी एक खास सुविधा आणली आहे. 'बाय नाउ पे लेटर' (Buy Now Pay Later) या धर्तीवर अ‍ॅमेझॉनची अ‍ॅमेझॉन पे लेटर (Amazon Pay Later) सुविधा आहे.

ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनने (Amazon) यासाठी एक खास सुविधा आणली आहे. 'बाय नाउ पे लेटर' (Buy Now Pay Later) या धर्तीवर अ‍ॅमेझॉनची अ‍ॅमेझॉन पे लेटर (Amazon Pay Later) सुविधा आहे.

नवी दिल्ली, 22 जानेवारी : शॉपिंग करायचं आहे पण पैशांची तंगी असल्याने करता येत नाही? अशी समस्या असल्यास अ‍ॅमेझॉनने एक सुविधा आणली आहे. ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनने (Amazon) यासाठी एक खास सुविधा आणली आहे. 'बाय नाउ पे लेटर' (Buy Now Pay Later) या धर्तीवर अ‍ॅमेझॉनची अ‍ॅमेझॉन पे लेटर (Amazon Pay Later) सुविधा आहे.

या सुविधेअंतर्गत अ‍ॅमेझॉन युजरच्या प्रोफाइलच्या हिशोबाने 60 हजार रुपयांपर्यंतचं क्रेडिट लिमिट मिळतं. या क्रेडिट लिमिटमध्ये युजर शॉपिंग करू शकतो आणि याचं पेमेंटही नंतर करता येतं. अ‍ॅमेझॉन पे लेटरमध्ये (Amazon Pay Later) मिळणाऱ्या लिमिटमधून तुम्ही रिचार्ज, बिल पेमेंट आणि शॉपिंगही करू शकता.

विना व्याज करता येईल रिपेमेंट -

तुम्ही कोणत्याही व्याजाशिवाय किंवा अतिरिक्त शुल्काशिवाय (एक्स्ट्रा चार्जशिवाय) पुढील महिन्यासाठी वापरलेली मर्यादा परत करू शकता. तुम्ही शॉपिंग केलेल्या रकमेसाठी EMI देखील मिळवू शकता. तुम्ही ईएमआयद्वारे पैसे भरल्यास तुम्हाला निर्धारित व्याजदरानुसार पैसे द्यावे लागतील.

हे वाचा - Amazon आणि Flipkart सेलमध्ये डिस्काउंटसह मिळवा कॅशबॅकचा फायदा,या Appsचा करा वापर

कोण करू शकेल Buy Now Pay Later सुविधेचा वापर -

अ‍ॅमेझॉनच्या या सुविधेचा वापर करण्यासाठी तुमचं वय कमीत-कमी 23 वर्ष असणं गरजेचं आहे. तसंच तुमच्या वेरिफाइड मोबाइल नंबरवर अ‍ॅमेझॉन अकाउंट (Amazon Account) असणं आवश्यक आहे. पॅन कार्ड आणि बँक अकाउंटसह अ‍ॅड्रेस प्रुफ असणंही गरजेचं आहे. यात ड्रायव्हिंग लायसन्स (DL), वोटर आयडी (Voter ID), आधार कार्ड (Aadhaar Card) किंवा पासपोर्टही (Passport) वापरता येऊ शकतो.

हे वाचा - Amazon: खरेदी करा WiFi वर चालणारा गिझर, Alexa वरुनही देता येईल कमांड

असं अ‍ॅक्टिव्ह करा अकाउंट -

सर्वात आधी Amazon Pay वर जावं लागेल. इथे Amazon Pay Later ऑप्शन दिसेल.

आता Get Started वर क्लिक करुन रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल. आता Activate in 60 Seconds वर टॅप करा. त्यानंतर KYC प्रोसेस सुरू होईल.

आता काही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. त्यानंतर पॅन कार्डचे शेवटचे 4 डिजीट द्यावे लागतील.

वेरिफिकेशननंतर क्रेडिट लिमिट दिलं जाईल.

First published:
top videos

    Tags: Amazon, Online shopping, Tech news