नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : काही दिवसांमध्ये तुम्हाला Facebook चा लुक बदललेला दिसेल. कंपनीने आपल्या पेजमध्ये बदल केल्यानंतर भारतात ते रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने Facebook Pages वरील Likes Button हटवलं असून फॉलोवर्सवर अधिक फोकस केला आहे. कंपनीने यावर्षी जानेवारीमध्ये आपलं डिझाइन तयार केलं होतं. परंतु भारतात ते आता रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे.
Facebook Pages वर न्यूज फीडचा वेगळा ऑप्शन असेल, जो युजर्सला ट्रेन्ड्स फॉलो करण्यासाठी, आपल्या जाणकारांसोबत इंटरॅक्ट करण्यासाठी आणि फॅन्ससोबत जोडण्याचं स्वातंत्र्य देईल.
कंपनीने एक स्टेटमेंट जारी करत सांगितलं, की या डिझाइनमुळे लोकांना अतिशय सहजता वाटेल. ते आपल्या जाणकारांशी आणि मित्रांशी योग्यरित्या बोलू शकतील आणि वेगवेगळे ट्रेन्ड्स फॉलो करू शकतील. महत्त्वाची बाब म्हणजे, यामुळे लाइक्स, डिस्लाइकच्या हिशोबाने तुम्हाला पब्लिक फिगर्स, पेजेस, ग्रुप्स आणि ट्रेंडिंग कंटेंटबाबत माहिती देत राहील. युजर्स आपलं पर्सनल प्रोफाइल आणि पेजेसमध्ये सहजपणे नेविगेट करू शकतील.
त्याशिवाय सुरक्षा आणि प्रामाणिकतेसाठीही काही गोष्टी करण्यात आल्या आहेत. हेट स्पीच, हिंसक पोस्ट, सेक्शुअल किंवा स्पॅम कंटेंटची ओळख करणं आता आणखी सोपं होईल. फेसबुकने आता ब्लूक टीकची श्रेणी वाढवली आहे, जेणेकरुन योग्य पेज आणि प्रोफाइल सहजपणे ओळखता येईल.
तुमचं फेसबुक अकाउंट कसं सुरक्षित ठेवाल -
- तुमची फ्रेंडलिस्ट स्वत:साठीच ओपन ठेवा. तुमचे फ्रेंड्स इतरांना दिसू नये यासाठी who can see your friend list मध्ये only me हा पर्याय निवडा.
- फोटो, व्हिडीओ डाउनलोड न होण्यासाठी lock your profile वर क्लिक करा.
- अनोळखी व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यासाठीचा पर्याय बंद करा. केवळ friends of friends हा पर्याय ठेवा.
- तसंच फेसबुक अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी two-factor authentication ऑन ठेवा.
- तुमचा फोन नंबर, ईमेल आयडी इतरांना दिसू नये, यासाठी only me पर्याय निवडा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.