मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Facebook मध्ये दिसेल TikTok सारखे फीचर! शॉर्ट व्हिडीओ बनवण्याबाबत टेस्टिंग सुरू

Facebook मध्ये दिसेल TikTok सारखे फीचर! शॉर्ट व्हिडीओ बनवण्याबाबत टेस्टिंग सुरू

भारतात चिनी अ‍ॅप टिकटॉक (TikTok) बॅन केल्यानंतर त्यासारखेच अनेक Apps समोर आले आहेत. फेसबुकने नुकतेच इन्स्टाग्रामवर (Instagram) रिल्स (Reels) नावाचे फीचर लाँच केले होते.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 18 ऑगस्ट : भारतात चिनी अ‍ॅप टिकटॉक (TikTok) बॅन केल्यानंतर त्यासारखेच अनेक Apps समोर आले आहेत. फेसबुकने नुकतेच इन्स्टाग्रामवर (Instagram) रिल्स (Reels) नावाचे फीचर लाँच केले होते. ज्यामध्ये काहीशा बदलांसह जवळपास टिकटॉकसारखे हे फीचर आहे. इतर अ‍ॅप्सच्या तुलनेत रिल्सने कमी वेळात युजर्सकडून अधिक पसंती मिळवली आहे. आता कंपनीकडून त्यांचे मुख्य अ‍ॅप असणाऱ्या फेसबुकमध्ये देखील भारतीय युजर्ससाठी या फीचरची टेस्टिंग सुरू आहे. कंपनी लवकरच या फीचरची अधिकृत घोषणा करू शकते. फेसबुकच्या मुख्य अ‍ॅपमध्ये शॉर्ट व्हिडीओ क्लिप्स बनवणाऱ्या फीचरची टेस्टिंग काही युजर्सबरोबर केली जात आहे, जे फीडमध्ये दिसेल. भारतामध्ये टिकटॉकचे करोडो युजर्स होते, अशावेळी फेसबुकसाठी ही चांगली संधी ठरू शकते.

(हे वाचा-मोठी बातमी! बंद होतेय देशातील ही सरकारी कंपनी, वाचा कर्मचाऱ्यांचे काय होणार)

या फीचरमध्ये युजरला  Create Short Video चा पर्याय देखील दिला जाईल. ज्यावर टॅप केल्यानंतर फेसबुक कॅमेरा ओपन होईल. या फीचरमध्ये शॉर्ट व्हिडीओमध्ये टेक्स्ट देखील करता येऊ शकते. त्याचप्रमाणे टिकटॉकप्रमाणे बँकग्राउंडमध्ये म्युझिक देखील अ‍ॅड करता येईल. फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या देखील भारतामध्ये अधिक आहे. या युजर्सना लक्ष्य करून फेसबुक हे नवे फीचर लाँच करण्याच्या विचारात आहे.

(हे वाचा-मोठ्या घसरणीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने वधारले, भारतावर होणार असा परिणाम)

काय आहे इन्स्टाग्रामन Reels?

हे सँडअलोन App नसून इन्स्टाग्रामचे एक फीचर आहे. या अ‍ॅपद्वारे15 सेकंदांची मल्टी-क्लिप बनवता येते.  या क्लिपमध्ये ऑडिओ, इफेक्ट्स आणि नवीन क्रिएटिव्ह टूल्स सहज अ‍ॅप करता येतात. युजरला फीड किंवा स्टोरीच्या स्वरुपात हा व्हिडीओ पोस्ट करता येईल. स्टोरी 24 तासानंतर दिसणार नाही. ऑडिओ, एआर इफेक्ट, टाइमर आणि काउंटडाउन, अलाइन आणि स्पीड टूल्स इन्स्टाग्राम रील्समध्ये आहेत. शॉर्ट क्लिप्स यामध्ये एडिट देखील करता येतील.

First published:

Tags: Facebook, Instagram