नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : अमेरिकन डॉलरचे मुल्य घसरल्यामुळे आणि जगभरातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरेन बफे (Warren Buffet) यांची कंपनी हाथवे बर्कशायरच्या (Hathaway Berkshire) एका मोठ्या करारानंतर सोन्याच्या किंमतींना आंतरराष्ट्रीय बाजारात उसळी मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती 2 टक्क्यांनी वाढून 1980 डॉलर प्रति औंस या स्तरावर पोहोचल्या आहेत. त्याचप्रमाणे तज्ज्ञांचे मते सोन्याच्या वाढत्या किंमतींचा काळ अद्याप संपलेला नाही आहे. सद्यपरिस्थिती पाहता सोन्याच्या किंमती 2020 डॉलर प्रति औंस या स्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे. याचा मोठा परिणाम भारतीय बाजारावर होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत बाजारात देखील सोन्याच्या किंमती वाढू शकतात. दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमती 60 हजार रुपये प्रति तोळापर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (हे वाचा- महिला असल्यामुळे नाकारली होती नोकरी, स्वत: उभारली 50 हजार कोटींची कंपनी ) जगातील सर्वात मोठे ब्रोकरेज हाऊसच्या अहवालानुसार गेल्या संपूर्ण दशकात सोन्याच्या किंमतीमध्ये मोठे चढउतार पाहायला मिळाले. मोठ्या काळासाठी मंदी असून देखील सध्याच्या अस्थिरतेने असे स्पष्ट केले आहे की, सोने 1700 डॉलर प्रति औंसपेक्षा कमी होण्याची संभावना नाही आहे. सध्याच्या परिस्थितीत सोन्याचे भाव कमी होऊ शकतात. जसे नेहमी सट्टाबाजारात होत की किंमती अचानक वेगाने वरखाली होत असतात. सोने देखील कमी होईल पण अधिक प्रमाणात कमी होण्याची शक्यता कमी आहे. (हे वाचा- SBI ची खास सुविधा! पैशांची गरज भासल्यास काढू शकता बँक बॅलन्सपेक्षा अधिक रक्कम ) पुढील दशकाच्या मध्यापर्यंत सोने 1800 डॉलरच्या दिशेने वाढेल. जागतिक अर्थव्यवस्थेची अवस्था पाहता सध्या सोन्याचे भाव काहीसे कमी होतील, मात्र ते 1700 डॉलर प्रति औंसच्या वरच राहण्याची शक्यता जास्त आहे. भारतावर काय होणार परिणाम? एसकोर्ट सिक्योरिटीचे रिसर्च हेड आसिफ इकबाल यांनी न्यूज 18 शी बोलताना अशी माहिती दिली की, सध्याच्या काळात सोन्याच्या किंमती वाढण्याची परिस्थिती कायम राहील. कारण जगाच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा परिणाम स्पष्ट पाहायला मिळत आहे. यामुळे भारतीय बाजारात पुन्हा तेजी येऊ शकते. मात्र ही तेजी मर्यादित राहिल. अमेरिकन रिसर्च एजन्सी जेपी मॉर्गनचे असे म्हणणे आहे की, दिवाळीपर्यंत सध्या आर्थिक, महामारी आणि राजकीय परिस्थिती पाहता से 60 ते 65 हजार रुपये प्रति तोळा पोहोचू शकते. त्यांच्या मते जरी आता कोरोना व्हॅक्सिन उपलब्ध झाले तरीही ग्लोबल इकॉनॉमी सुधारण्यास खूप वेळ जाईल. तोपर्यंत सोन्याच्या किंमती वाढत राहतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.