Home /News /money /

मोठी बातमी! बंद होतेय देशातील ही महत्त्वाची सरकारी कंपनी, वाचा कर्मचाऱ्यांचे काय होणार

मोठी बातमी! बंद होतेय देशातील ही महत्त्वाची सरकारी कंपनी, वाचा कर्मचाऱ्यांचे काय होणार

70 ते 90 च्या दशकांत अनेकांच्या मनावर अधिराज्य करणारी स्कूटर लँब्रेटाला (Lambretta Scooter) भारतात बनवणारी सरकारी कंपनी स्कूटर्स इंडिया (Scooters India) बंद करण्याची तयारी सरकार करत आहे.

    लक्ष्मण राय, नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : 70 ते 90 च्या दशकांत अनेकांच्या मनावर अधिराज्य करणारी स्कूटर लँब्रेटाला (Lambretta Scooter) भारतात बनवणारी सरकारी कंपनी स्कूटर्स इंडिया (Scooters India) बंद करण्याची तयारी सरकार करत आहे. CNBC आवाजला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातील सरकारने या कंपनीची संपूर्ण भागीदारी विकण्याची योजना बनवली होती. मात्र कुणी स्कूटर्स इंडियाची खरेदी करण्यासाठी उत्साह दाखवला नाही, त्यामुळे आता सरकार ही कंपनी विकू शकते. स्कूटर्स इंडियामध्ये सरकारची 93.87 टक्के भागीदारी आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्के अप्पर सर्किट (जेव्हा शेअर खरेदी करणारेच असतात आणि विकणारा नसतो) लागू झाला आहे. केव्हापर्यंत बंद होईल स्कूटर इंडिया? अवजड उद्योग मंत्रालयाने स्कूटर्स इंडिया बंद करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांची सर्व जमीन विकली जाईल. जमीन उत्तर प्रदेश सरकारला परत केली जाईल. यंत्रे आणि प्लांट देखील विकले जाईल. कर्मचार्‍यांचे काय होईल? स्कूटर इंडियाचा ब्रँड स्वतंत्रपणे विकला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याची संपूर्ण ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे. कंपनीची विक्री करण्याची जबाबदारी एमएसटीसी (MSTC-Metal Scrap Trading Corporation) देण्यात येईल. ही सरकारी कंपनी विकून पैसे मिळतील. याचा उपयोग कर्मचार्‍यांच्या व्हीआरएससाठी केला जाईल. (हे वाचा-मोठ्या घसरणीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने वधारले, भारतावर होणार असा परिणाम) कंपनी बंद होण्याआधीच कंपनीला शेअर बाजारातून देखील डीलिस्ट केले जाईल. अवजड उद्योग मंत्रालयाने यासंदर्भातील प्रस्ताव कॅबिनेटकडे पाठवला आहे. कॅबिनेटच्या मंजूरीनंतर यावर पुढे काम केले जाईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या