मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तब्बल 7 तासांनी पुन्हा सुरू झालं WhatsApp, Facebook आणि Insta; कंपनीनं मागितली माफी

तब्बल 7 तासांनी पुन्हा सुरू झालं WhatsApp, Facebook आणि Insta; कंपनीनं मागितली माफी

सोमवारी सुमारे 9 वाजून 15 मिनिटांनी तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाउन झाले होते. हे 3 प्लॅटफॉर्म तब्बल 7 तास डाउन राहिल्यानं जगभरातील वापरकर्त्यांना याचा फटका बसला

सोमवारी सुमारे 9 वाजून 15 मिनिटांनी तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाउन झाले होते. हे 3 प्लॅटफॉर्म तब्बल 7 तास डाउन राहिल्यानं जगभरातील वापरकर्त्यांना याचा फटका बसला

सोमवारी सुमारे 9 वाजून 15 मिनिटांनी तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाउन झाले होते. हे 3 प्लॅटफॉर्म तब्बल 7 तास डाउन राहिल्यानं जगभरातील वापरकर्त्यांना याचा फटका बसला

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 05 ऑक्टोबर : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सेवा जगभरात अनेक तास बंद (Facebook, Instagram and Whatsapp Down for 7 Hours) होती. मंगळवारी पहाटेपासून यातील एक एक प्लॅटफॉर्म पुन्हा सुरळित काम करू लागले (Facebook, Instagram and WhatsApp Returned Online). सोमवारी सुमारे 9 वाजून 15 मिनिटांनी तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाउन झाले होते. हे 3 प्लॅटफॉर्म तब्बल 7 तास डाउन राहिल्यानं जगभरातील वापरकर्त्यांना याचा फटका बसला. डाउन राहिल्यानं फेसबुकच्या शेअरमध्ये तब्बल 5 टक्क्यांची घसरण झाली. मात्र, इतके तास व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाउन का होतं, हे अद्याप समजलेलं नाही.

फेसबुकनं ट्विट करत म्हटलं, की जगभरातील लोक, व्यवसायिक आणि मोठा समुदाय जो आमच्यावर अवलंबून आहे, त्यांची माफी मागतो. आम्ही आमचे अॅप्स आणि सेवा पुन्हा सुरळित करण्यासाठी मेहनत घेत आहोत. आता हे सांगताना आनंद होत आहे, की या सेवा पुन्हा सुरळित सुरू झाल्या आहेत. आमच्यासोबत काम करण्यासाठी धन्यवाद.

Breaking: सोशल मीडिया थंड! Facebook, Whatsapp down

फेसबुकचे सीईओ मार्क झकरबर्ग यांनी म्हटलं, की व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि मेसेंजर पुन्हा ऑनलाईन झाले आहेत. त्रासासाठी माफी मागतो. तुम्ही ज्या लोकांची काळजी करता त्यांच्यासोबत संपर्कात राहण्यासाठी तुम्ही आमच्या या सेवांवर किती अवलंबून आहात, याची आम्हाला कल्पना आहे.

फेसबुकचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी Mike Schroepfer यांनी ट्विट केलं की, या सेवा बंद झाल्यामुळे प्रभावित झालेल्या सर्वांची मी मनापासून क्षमा मागतो. आम्ही नेटवर्किंग समस्या अनुभवत आहोत आणि टीम शक्य तितक्या लवकर या सेवा सुरू करण्यासाठी काम करत आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं, की फेसबुक सेवा पुन्हा सुरू झाली आहे. 100 टक्के सुरळित सुरू होण्यासाठी आणखी काही वेळ लागेल. प्रत्येक लहान-मोठे व्यवसायिक, कुटुंब आणि आमच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीची माफी मागतो.

बापरे रे बाप! इवल्याशा खारीचा एवढा मोठा 'कार'नामा; पाहूनच तोंडात बोटं घालाल

याआधी सोमवारी रात्री फेसबुकनं म्हटलं होतं, की आम्हाला माहिती आहे, की काही लोकांनी आमच्या अॅप्सचा वापर करण्यात अडचणी येत आहेत. आम्ही ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. कोणत्याही असुविधेसाठी क्षमा मागतो.

First published:

Tags: Facebook, Instagram, Whatsapp