मराठी बातम्या /बातम्या /Viral /बापरे रे बाप! इवल्याशा खारीचा एवढा मोठा 'कार'नामा; पाहूनच तोंडात बोटं घालाल

बापरे रे बाप! इवल्याशा खारीचा एवढा मोठा 'कार'नामा; पाहूनच तोंडात बोटं घालाल

खारीने जे केलं आहे, ते पाहून तर तुम्ही थक्कच व्हाल. एवढीशी खार इतकं काही करू शकते का?, असाच प्रश्न तुम्हाला पडेल.

खारीने जे केलं आहे, ते पाहून तर तुम्ही थक्कच व्हाल. एवढीशी खार इतकं काही करू शकते का?, असाच प्रश्न तुम्हाला पडेल.

खारीने जे केलं आहे, ते पाहून तर तुम्ही थक्कच व्हाल. एवढीशी खार इतकं काही करू शकते का?, असाच प्रश्न तुम्हाला पडेल.

मुंबई, 04 ऑक्टोबर : खार (squirrel) इटुकली पिटुकली असते पण ती खूप चपळ असते. म्हणतात ना, मूर्ती लहान कीर्ती महान. तसंच काही या खारीतही असतं (squirrel collected walnut). रामायणातही रामसेतू बांधण्यात खारीनेही योगदान दिलं होतं, असं सांगितलं जातं. खारीचा हा छोटासा वाटा जर एकत्र केला तर किती मोठा होऊ शकतो (squirrel eating walnut), याचं प्रत्यक्ष उदाहरण सध्या पाहायला मिळतो आहे (squirrel hide walnut into the car). छोट्याशा खारीने केलेला मोठा कारनामा (shocking photo) सध्या सोशल मीडियावर (Social media) चर्चेत आहे.

एका खारीने असं काही केलं आहे ही तिचीच चर्चा होऊ लागली आहे. छोटीशी असली तरी खार काय करू शकते, याचा तुम्ही विचारही केला नसेल. खारीने जे केलं आहे, ते पाहून तर तुम्ही थक्कच व्हाल. एवढीशी खार इतकं काही करू शकते का?, असाच प्रश्न तुम्हाला पडेल.

बिल फिशर नावाच्या फेसबुक अकाऊंटवर काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. जो पाहिल्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे.

हे वाचा - सावध राहा! सार्वजनिक शौचालयातच दबा धरून बसलाय जंगलाचा राजा; हा VIDEO कुठला पाहा

फोटोत पाहू शकता एका गाडीत बरेच अक्रोड आहेत. कार अक्रोडनेच भरलेली आहे. आता कारमध्ये इतके अक्रोड कोणत्या माणसाने नाही ठेवलेत बरं का? हा सर्व प्रताप केला आहे तो इवल्याशा खारूताईने केला आहे.

पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार खारीने अक्रोड चोरले आणि ते कारमध्ये लपवून ठेवले. अगदी कारच्या बोनेटमध्येही तिने अक्रोड लपवले.एक लाल रंगाची खार चार दिवसांत किती अक्रोड उचलू शकते आणि जमवू शकते?  5 बादल्या अक्रोड झालेत. आता हे साफ करायला मला वेळही नाही. जवळपास दोन बादली अक्रोड कारमध्ये तसेच आहेत.

हे वाचा - Shocking video - पक्ष्याने धडक देताच पेटलं विमान; प्रवाशांनी धडाधड मारल्या उड्या

या बादल्यांमध्ये जे अक्रोड आहेत, ते बोनेटमध्ये लपवलेले होते. अक्रोडने भरलेल्या बादलीचं वजन अंदाजे जवळपास 26 पाऊंट आहे.

First published:
top videos

    Tags: Other animal, Viral, Viral photo