मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Breaking: सोशल मीडिया थंड! Facebook, Whatsapp, Insta down

Breaking: सोशल मीडिया थंड! Facebook, Whatsapp, Insta down

Facebook ची मालकी असलेल्या सगळ्या सोशल मीडिया साइट्सना भारतीय प्रमाणवेळेप्रमाणे सोमवारी रात्रीपासून अडचणी येऊ लागल्या. Facebook, Instagram, Whatsapp बंद असल्याचे मेसेज ट्विटरवर (twitter trend)फिरत होते.

    नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर: देशात अनेक यूजर्सना सोशल मीडिया वापरत असताना अडचणी येत आहेत. सोमवारी रात्री 8.30 नंतर Whatsapp, Facebook आणि Instagram या फेसबुक संचलित तीनही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची कनेक्टिव्हिटी अचानक गेली. Whatsapp down असल्याचं अधिकृतरीत्या अद्याप सांगण्यात आलेलं नसलं तरी जगभरात मोठ्या प्रमाणावर या मोबाइल अॅपला तांत्रिक अडचणींनी घेतलं होतं. तसंच भारतातल्या अनेक यूजर्सना facebook आणि instagram वापरतानाही अडचणी येत होत्या.

    फेसबुकने घेतली TWITTER ची मदत

    फेसबुकच्या ताब्यातल्या सगळ्याच सोशल मीडिया अॅप्सना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने यूजर्सपर्यंत पोहोचण्यासाठी Facebook ने twitter ची मदत घेतली. Instagram आणि whatsapp सुद्धा बंद पडल्याने फेसबुकने ट्वीट करून याची दखल घेतली.

    Facebook ची मालकी असलेल्या सगळ्या सोशल मीडिया साइट्सना भारतीय प्रमाणवेळेप्रमाणे सोमवारी रात्रीपासून अडचणी येऊ लागल्या. Facebook, Instagram, Whatsapp बंद असल्याचे मेसेज ट्विटरवर (twitter trend)फिरत होते.

    Facebook च्या वेबसाइटवर याबद्दल दखल घेण्यात आली. Sorry, something went wrong. We're working on it and we'll get it fixed as soon as we can 'क्षमा करा, काहीतरी बिघडलं आहे. आम्ही ते शोधायचा प्रयत्न करत आहोत. लवकरात लवकर आम्ही दुरुस्ती करू', असा मेसेज facebook ने त्यांच्या वेबसाइटवर केला होता.

    नेमक्या कुठल्या कारणाने हा तांत्रिक बिघाड झाला आहे, किती यूजर्सना याचा फटका बसला आहे, याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही.

    ही बातमी अपडेट होत आहे.

    First published:
    top videos

      Tags: Facebook, Instagram, Whatsapp