मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Facebook वर आता छोट्या व्यवसायिकांना मिळणार कर्ज घेण्याची सुविधा, वाचा काय आहे प्रोसेस

Facebook वर आता छोट्या व्यवसायिकांना मिळणार कर्ज घेण्याची सुविधा, वाचा काय आहे प्रोसेस

फेसबुक इंडियाने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर जाहिराती (Facebook Advertisement) देणाऱ्या व्यवसायिकांना अल्प कालावधीत कर्ज उपलब्ध करुन दिलं जाईल, अशी माहिती दिली आहे.

फेसबुक इंडियाने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर जाहिराती (Facebook Advertisement) देणाऱ्या व्यवसायिकांना अल्प कालावधीत कर्ज उपलब्ध करुन दिलं जाईल, अशी माहिती दिली आहे.

फेसबुक इंडियाने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर जाहिराती (Facebook Advertisement) देणाऱ्या व्यवसायिकांना अल्प कालावधीत कर्ज उपलब्ध करुन दिलं जाईल, अशी माहिती दिली आहे.

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : फेसबुक इंडियाने (Facebook India) छोट्या आणि मध्यम व्यवसायिकांच्या मदतीसाठी कर्ज (Small Business Loan) देण्याची सुविधा सुरू केली आहे. फेसबुक इंडियाने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर जाहिराती (Facebook Advertisement) देणाऱ्या व्यवसायिकांना स्वतंत्र कर्जदार भागीदारांद्वारे अल्प कालावधीत कर्ज उपलब्ध करुन दिलं जाईल, अशी माहिती दिली आहे. वृत्तसंस्था पीटीआयने (PTI) दिलेल्या माहितीनुसार, भारत हा पहिला आणि एकमेव असा देश आहे, जिथे फेसबुक अशाप्रकारचा उपक्रम करणार आहे. हा उपक्रम भारतातील 200 शहरं आणि शहरांमध्ये नोंदणीकृत व्यवसायांसाठी खुला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांनी सांगितलं, की लघु उद्योजकांना व्यवसाय कर्ज अधिक सहज उपलब्ध करुन देणं आणि सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील कर्जाचं अतंर कमी करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

तुमच्या कामाची बातमी!प्रवासाआधीच समजणार Toll ची किंमत,Google Maps चं भन्नाट फीचर

फेसबुकने यासाठी इंडिफीसह (indifi) पार्टनरशिप केली आहे. याअंतर्गत फेसबुक प्लॅटफॉर्मवर जाहिराती देणाऱ्या लहान उद्योजकांना 5 लाखांपासून ते 50 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज घेता येईल. त्यावर त्यांना आधीच निश्चित केलेल्या 17 ते 20 टक्के दराने व्याज द्यावं लागेल. कर्जाच्या अर्जासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही.

Alert:एका चुकीने इंजिनिअरला हजारोचा फटका!त्याने केलेली चूक तुम्ही अजिबात करू नका

त्याशिवाय, सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या कर्जदारांना कर्जाची रक्कम पाच वर्किंग डेजमध्ये उपलब्ध करुन दिली जाईल. लहान व्यवसाय जे पूर्णपणे किंवा अंशत: महिलांच्या मालकीचे आहेत, त्यांना लागू कर्जाच्या व्याज दरावर वार्षिक 0.2 टक्क्यांची विशेष सूट दिली जाईल.

First published:

Tags: Facebook, Loan