Home /News /technology /

Facebook वरील गर्लफ्रेंडपासून सावधान, डिजिटल Kiss च्या नादात व्हाल कंगाल

Facebook वरील गर्लफ्रेंडपासून सावधान, डिजिटल Kiss च्या नादात व्हाल कंगाल

File Photo

File Photo

अशा फसवणुकीच्या घटनांपासून तुमचं संरक्षण व्हावं, या उद्देशाने न्यूज 18 एक मालिका चालवत आहे.

    नवी दिल्ली, 1 सप्टेंबर : आजच्या काळात मित्रांशी संपर्कात राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सोशल मीडिया (Social Media). फेसबुक (Facebook) हा सध्याच्या काळातला सर्वांत मोठा आणि लोकप्रिय प्लॅटफॉर्म (Platform) आहे. मित्रांशी संपर्कात राहण्यासोबतच नवे मित्र बनवण्याचा ट्रेंडही (Trend) फेसबुकवर पाहायला मिळतो. फेसबुकवरचे तुमचे काही मित्र (मुलं किंवा मुली) असे असतात, की ज्यांना तुम्ही कधीही प्रत्यक्षात भेटलेले नसता. हे असेच मित्र काही वेळा फसवणूक (Fraud) करू शकतात. गगन नावाच्या एका व्यक्तीची फेसबुकवरून कशी फसवणूक झाली, हे तुम्ही जाणून घेतलंच, तर तुम्हाला हे षड्यंत्र कसं असतं हे लक्षात येईल. अशा फसवणुकीच्या घटनांपासून तुमचं संरक्षण व्हावं, या उद्देशाने न्यूज 18 एक मालिका चालवत आहे. तुम्ही सतर्क राहावं, तुमची फसवणूक होऊ नये, यासाठी अशा फसवणुकीच्या प्रकारांविषयीची पूर्ण माहिती या मालिकेतून दिली जाणार आहे. अशी आहे गगनची कहाणी गगन फेसबुकवर बराच वेळ घालवत असे. आपल्याला फेसबुकवर मैत्रिणी हव्यात म्हणून तो नेहमीच मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट (Friend Request) पाठवत असे. यापैकी काही मुली रिक्वेस्ट स्वीकारत तर काही नाकारत. एके दिवशी गगनला एका परदेशी तरुणीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. गगनने क्षणाचाही विलंब न करता ती रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर या दोघांमध्ये चॅटिंग सुरू झालं. Broadband कनेक्शन घेणाऱ्यांना Cashback मिळणार? TRAI कडून इतक्या कॅशबॅकचा प्रस्ताव हे दोघे तासंतास चॅटिंग (Chatting) करत असत. आपण रशियन (Russian) असून, एका कंपनीत काम करत असल्याचं त्या तरुणीनं गगनला सांगितलं. जेव्हा काम नसतं तेव्हा कंटाळा येतो आणि हा कंटाळा दूर करण्यासाठी फेसबुक फ्रेंड्ससोबत चॅटिंग करत असल्याचं त्या तरुणीनं गगनला सांगितलं. गुगल ट्रान्सलेशनच्या मदतीनं व्हायचे चॅटिंग 'माझे मित्र वेगवेगळ्या देशांमधले आहेत आणि प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारण्याकरिता मी गुगल ट्रान्सलेशनची मदत घेते,' असं त्या तरुणीने गगनला सांगितलं. त्या तरुणीनं गगनचं भरपूर कौतुक केलं. 'गगन, तू खूप सुंदर दिसतोस. तुझ्या दाढीची स्टाइल चांगली आहे,' असं कौतुक त्या तरुणीनं केलं. त्यामुळे गगनला आनंद झाला. या तरुणीशी व्हिडीओ कॉलवर संवाद व्हावा, असं गगनला नेहमी वाटे. परंतु, 'ऑफिसमध्ये असल्याने व्हिडीओ कॉल करू शकत नाही. केवळ चॅटिंग होऊ शकतं,' असं त्या तरुणीनं गगनला सांगितलं. गगन त्या रशियन तरुणीच्या बोलण्यावर इतका भाळला, की त्याने तिला भारतात येण्याचं आमंत्रण दिलं. 'माझ्याकडे भरपूर जमीन असून, मी सधन आहे. तू भारतात आलीस, तर मी तुला माझ्या पैशांनी भारतातल्या अनेक ठिकाणी पर्यटनास घेऊन जाईन,' असं गगनने त्या तरुणीला सांगितलं. WhatsApp ने बॅन केली 30 लाख अकाउंट्स, सांगितलं Ban मागचं कारण खरी चाल 'मी भारतात येऊ शकत नाही; पण आपल्यात कायम मैत्री राहील आणि सातत्याने आपण गप्पा मारत राहू. तसंच मी तुला रशियातून गिफ्ट पाठवीन,' असं त्या तरुणीने गगनला सांगितलं. गिफ्ट काय असेल, असा प्रश्न गगनने तिला विचारला. 'ते एक सिक्रेट असेल, जेव्हा तू हे गिफ्ट पाहशील तेव्हा तुला समजेल,' असं उत्तर त्या तरुणीने दिलं. हे ऐकून गगनला खूप आनंद झाला. त्यानंतर बरेच दिवस दोघांमध्ये काहीच संवाद झाला नाही. एके दिवशी त्या तरुणीचा गगनला मेसेज आला आणि तिने गिफ्टचा (Gift) फोटो गगनला पाठवला. गिफ्ट पॅक केलेलं होतं. 'या बॉक्समध्ये मी काही फोटोज पाठवत असून, ते तू एकटा असताना पाहा,' असं त्या तरुणीनं सांगितलं. त्यानंतर त्या तरुणीने गिफ्ट पाठवण्यासाठी गगनचा पत्ता घेतला आणि आठवडाभरात गिफ्ट पोहोचेल, असं तरुणीनं सांगितलं. गिफ्टच्या नादात गगन फसला आता गगन गिफ्टच्या प्रतीक्षेत होता. दररोज त्या तरुणीशी त्याचं चॅटिंग सुरू होतं. गिफ्ट मिळालं का, असं त्या तरुणीने गगनला विचारले. शेवटी 6 दिवसांनंतर गगनला एक फोन आला. फोनवर समोरच्या व्यक्तीने कस्टम ऑफिसर बोलत असल्याचं इंग्रजीत सांगितलं. त्या ऑफिसरने सांगितलं, की 'तुमचं रशियावरून आलेलं गिफ्ट कस्टममध्ये अडकलं आहे. या गिफ्ट बॉक्समध्ये एक महागडा डिजिटल कॅमेरा आणि एक आयफोन (iPhone) अशा दोन वस्तू आहेत. हा बॉक्स रिलीज करण्यासाठी तुम्हाला दिल्लीला यावं लागेल आणि कस्टम ड्युटी भरल्यानंतर हे गिफ्ट तुम्हाला मिळेल.' ऑनलाईन गुन्हेगारी थांबवण्यासाठी मोठं पाऊल, भारतात VPN सर्विस ब्लॉक होणार? यावर कस्टम ड्युटी (Custom Duty) किती आहे, असं गगनने विचारलं. दोन्ही वस्तू महाग असल्याने 29,856 रुपये ड्युटी भरावी लागेल, असं ऑफिसरने सांगितलं. परंतु, दिल्ली खूप लांब असल्याने दिल्लीला येऊ शकत नसल्याचं गगनने सांगितलं. तसंच कस्टम ड्युटी ऑनलाइन भरून गिफ्ट मिळू शकतं का, असा प्रश्न गगनने विचारला. 'त्यासाठी बॉक्स कुरिअर करावा लागेल आणि त्यासाठी 700 रुपये जास्त भरावे लागतील,' असं त्या ऑफिसरने सांगितलं. गगन या गोष्टीला राजी झाला आणि 30,556 रुपये लवकरच ऑनलाइन पाठवतो, असं त्यानं सांगितलं. कस्टम अधिकाऱ्याने गगनला एक बॅंक अकाउंट नंबर दिला आणि त्यावर पैसे जमा करण्यास सांगितलं. डिजिटल किसवर गगन भाळला संध्याकाळी जेव्हा गगनचं त्या तरुणीसोबत बोलणं झालं, तेव्हा त्याने या सर्व घडामोडी सांगितल्या. 'आमच्या देशात कस्टमचे असे काही नियम नाहीत. पाठवलेलं गिफ्ट संबंधिताला सहज मिळतं,' असं त्या तरुणीनं गगनला सांगितलं. 'मी उद्याच पैसे पाठवून गिफ्ट रिलीज करून घेतो,' असं गगनने तिला सांगितलं. यावर त्या तरुणीने गगनला डिजिटल किस पाठवला. गगनने दुसऱ्याच दिवशी सर्व रक्कम सांगितलेल्या अकाउंटवर ट्रान्स्फर केली. पैसे पाठविल्यानंतर गगनने कस्टम ऑफिसरला फोन केला. त्या वेळी 'पैसे मिळाले असून, लवकरच तुम्हाला गिफ्ट मिळेल,' असं त्या ऑफिसरने सांगितलं. या आश्वासनामुळे आपल्याला लवकरच गिफ्ट मिळेल, असा विश्वास गगनला वाटला; मात्र त्यानंतर आजपर्यंत गगनला गिफ्ट मिळालेलं नाही आणि कस्टम अधिकाऱ्यास त्याचा फोनही लागला नाही. त्या तरुणीने या प्रकारानंतर गगनला फेसबुकवर ब्लॉक करून टाकलं. तुम्ही गगनच्या जागी असतात, तर काय केलं असतंत? तुम्ही तरुणीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला असतात? गिफ्ट मिळण्यासाठी 30 हजार रुपये पाठवले असते का? आम्ही याबाबत सांगू शकत नाही. परंतु भविष्यात कोणाच्याही बाबतीत असा प्रसंग उद्भवू नये, म्हणून सावधगिरी बाळगा.
    First published:

    Tags: Facebook, Social media

    पुढील बातम्या