Home /News /technology /

ऑनलाईन गुन्हेगारी थांबवण्यासाठी मोठं पाऊल, भारतात VPN सर्विस ब्लॉक होणार?

ऑनलाईन गुन्हेगारी थांबवण्यासाठी मोठं पाऊल, भारतात VPN सर्विस ब्लॉक होणार?

संसदीय स्थायी समितीने भारत सरकारला भारतातील व्हीपीएनच्या वापरावर बंदी घालण्याची, VPN Block करण्याची विनंती केली आहे.

  नवी दिल्ली , 1 सप्टेंबर : संसदीय स्थायी समितीने भारत सरकारला भारतातील व्हीपीएनच्या वापरावर बंदी घालण्याची, VPN Block करण्याची विनंती केली आहे. गुन्हेगारांना ऑनलाईन चुकीच्या गोष्टी करण्याची परवानगी दिली जात असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गृहमंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी समन्वय साधणं आवश्यक असून इंटरनेट सर्विस प्रोव्हाइडरच्या मदतीने असे VPN ओळखून ते ब्लॉक करण्याचं सांगितलं आहे. त्याशिवाय, भारतातील अशा प्रकारचे VPN कायमस्वरुपी ब्लॉक करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय एजेन्सीसोबत समन्वय यंत्रणा विकसित करण्याचंही संसदीय स्थायी समितीने सुचवलं आहे. व्हीपीएन आणि डार्क वेबद्वारे उद्धवलेल्या अशा तांत्रिक गोष्टींचीही समितीने नोंद केली आहे, ज्यात सायबर सुरक्षेलाही मागे टाकण्यात आलं आहे. अनेक वेबसाईटद्वारे अशा सुविधा पुरवल्या जात असल्याने आतापर्यंत VPN सहज डाउनलोड केलं जाऊ शकत होतं. त्यामुळेच समितीने इंटरनेट प्रोव्हाइडरच्या मदतीने असे VPN ओळखून ते कायमस्वरुपी ब्लॉक करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी समन्वय साधला पाहिजे असं म्हटलं आहे. तसंच, VPN कायमस्वरुपी ब्लॉक केलं आहेत का, याची खात्री करण्यासाठी आंतरराष्ट्रीय एजेन्सीसोबत एक समन्वय यंत्रणा विकसित केली जावी, अशी शिफारसही समितीने केली आहे.

  Gmail Alert! तुम्हालाही असा Email आला तर सावध व्हा, अकाउंट रिकामं होण्याचा धोका

  VPN आणि Dark Web च्या वापरावर आळा घालण्यासाठी मंत्रालयाने अत्याधुनिका तंत्रज्ञानात आणखी सुधारणा आणि विकास करुन ट्रॅकिंग तसंच त्यावर नजर ठेवण्यासाठी यंत्रणा मजबूत करण्यासाठी पुढाकार घेणं आवश्यक असल्याचंही सांगण्यात आलं आहे. व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क अर्थात VPN चा वापर वेगवेगळे लोक वेगवेगळ्या कारणांसाठी करतात. अनेक जण याचा वापर भारतात उपलब्ध नसलेली माहिती, तसंच भारतात बंदी असलेल्या बेकायदेशीर गोष्टींमध्ये प्रवेश करण्यासाठीही करतात. त्यामुळेच अशाप्रकारे वापरल्या जाणाऱ्या VPN वर बंदीची मागणी करण्यात आली आहे.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या