मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Dolly Khanna पोर्टफोलिओच्या या शेअरने दिला 4100% रिटर्न! तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

Dolly Khanna पोर्टफोलिओच्या या शेअरने दिला 4100% रिटर्न! तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

 नितिन स्पिनर्स शेअर (Nitin Spinners Share) डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओ (Dolly Khanna Portfolio) मध्ये आहे. 2021 च्या मल्टीबॅगर शेअरमध्ये हा स्टॉक आहे आणि गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न देण्याचा या शेअरचा इतिहास आहे.

नितिन स्पिनर्स शेअर (Nitin Spinners Share) डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओ (Dolly Khanna Portfolio) मध्ये आहे. 2021 च्या मल्टीबॅगर शेअरमध्ये हा स्टॉक आहे आणि गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न देण्याचा या शेअरचा इतिहास आहे.

नितिन स्पिनर्स शेअर (Nitin Spinners Share) डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओ (Dolly Khanna Portfolio) मध्ये आहे. 2021 च्या मल्टीबॅगर शेअरमध्ये हा स्टॉक आहे आणि गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न देण्याचा या शेअरचा इतिहास आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर: भारतीय शेअर मार्केट (Stock Market Investment) यावेळी रेकॉर्ड स्तरावर आहेत. अशावेळी मार्केट एक्सपर्टकडून गुंतवणूकदारांना सुरक्षित गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात आहे. चेन्नईमधील गुंतवणूकदार लो प्राइस शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ओळखले जातात, जे दीर्घकालीन चांगला रिटर्न देतात. नितिन स्पिनर्स शेअर (Nitin Spinners Share) डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओ (Dolly Khanna Portfolio) मध्ये आहे. 2021 च्या मल्टीबॅगर शेअरमध्ये हा स्टॉक आहे आणि गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न देण्याचा या शेअरचा इतिहास आहे.

6 महिन्यात शेअर होल्डर्सचे पैसे झाले दुप्पट

डॉली खन्ना यांच्या या स्टॉकने (Nitin Spinners Share Price) गेल्या 6 महिन्यांत भागधारकांचे पैसे दुप्पट केले आहेत. गेल्या काही वर्षात या शेअरहोल्डर्सचे पैसे तिप्पट झाले आहेत. 11 नोव्हेंबर 2011 रोजी या शेअरची NSE वरील किंमत बंद होताना 6.20 रुपये होती. जी आता 18 नोव्हेंबर 2021 रोजी 259.40 रुपये झाली आहे. अर्थात या दहा वर्षांच्या कालावधीत शेअरने 4100% रिटर्न दिला आहे.

हे वाचा-जोडीदाराच्या निवृत्तिवेतनासाठी नवे संयुक्त बँक खाते अनिवार्य नाही

नितिन स्पिनर्स शेअरची प्राइस हिस्ट्री

या मल्टीबॅगर स्टॉकच्या शेअरच्या प्राइस हिस्ट्रीनुसार, हा शेअर एका महिन्यात सुमारे 227 रुपयांवरून 259.40 रुपयांपर्यंत वाढला आहे, या कालावधीत सुमारे 14% वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत, डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओमधील हा शेअर सुमारे रु. 120 वरून रु. 259.40 पर्यंत वाढला आहे, ज्यामुळे ज्यांनी सहा महिन्यांपूर्वी यात पैसे गुंतवले आहेत अशा भागधारकांना सुमारे 115% परतावा मिळाला आहे.  गेल्या एका वर्षात नितीन स्पिनर्सच्या शेअरची किंमत 49.55 रुपयांवरून 259.40 रुपये प्रति शेअर झाली आहे, या कालावधीत सुमारे 425% वाढ झाली आहे.

गेल्या 5 वर्षांत, डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओमधील या शेअरची किंमत 70 रुपयांवरून 259.40 रुपयांपर्यंत वाढली आहे, ज्यामुळे शेअरधारकांना अंदाजे 280% परतावा मिळाला आहे. गेल्या 10 वर्षात हा शेअर 6.20 रुपयांवरून 259.40 रुपयांपर्यंत वाढला आहे, अर्थात या काळात जवळपास 41 पटीने वाढ झाली आहे.

हे वाचा-Paytmची निराशाजनक एन्ट्री, गुंतवणूकदार चिंतेत; वॉरेन बफे यांना कोट्यवधींचा फायदा

किती आहे डॉली खन्ना यांची होल्डिंग?

जुलै ते सप्टेंबर 2021 या तिमाहीसाठी नितीन स्पिनर्सच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, डॉली खन्ना यांनी कंपनीतील भागीदारी 1.24% वरून 1.64% पर्यंत वाढवली. Q2 FY22 साठी कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, डॉली खन्ना यांच्याकडे कंपनीचे 9,23,373 शेअर्स किंवा 1.64% स्टेक आहेत, तर एप्रिल ते जून 2021 मध्ये कंपनीतील त्यांची होल्डिंग 6,95,095 शेअर्स किंवा एकूण पेड-अप कॅपिटलच्या 1.24% होती.

(Disclaimer: बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)

First published:

Tags: Investment, Money, Share market