Home /News /technology /

फेसबुक वापरताना 'या' चुका केल्यात तर तुमचं अकाउंट होऊ शकतं ब्लॉक!

फेसबुक वापरताना 'या' चुका केल्यात तर तुमचं अकाउंट होऊ शकतं ब्लॉक!

फेसबुकसह सोशल मीडियावरून दररोज तुम्ही अनेक गोष्टी शेअर करता. मात्र यात काही चुका केल्यास तुमचं अकाऊंट ब्लॉक होऊ शकतं.

    सोशल मीडियावर युजर्स त्यांच्या अकाउंटवरून सर्व माहिती देत असतात. कुटुंबापासून ते मोबाईल नंबर, इमेल आयडी इत्यादी माहिती जवळपास सर्वच सोशल मीडिया युजर्स शेअर करतात. मात्र अशा काही गोष्टी आहेत ज्या शेअर केल्याने तुमचे अकाऊंट ब्लॉक होऊ शकते. विशेषत: फेसबुकने त्यांच्या नियमात बदल केले आहेत. याची माहिती फेसबूककडून देण्यात आली आहे. फेसबुकवर कोणत्याही व्यक्ती किंवा गट, ठिकाण याविरुद्ध हिसा, धमकी देणारी वक्तव्ये शेअर करू नये. तसेच तुम्ही कोणाला धमकी दिल्यास किंवा खंडणी मागण्याचा प्रयत्न केल्यास फेसबुक तुमचे अकाउंट बंद करू शकते. दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी हिंसाचारसंबंधी पोस्ट, समाज कंटकांच्याद्वारे केल्या जाणाऱ्या पोस्ट फेसबुककडून डिलिट केल्या जातात. तसेच अशा प्रकारच्या अकाउंटबद्दल तक्रार केल्यास पेजसुद्धा ब्लॉक केलं जातं. बिगर सरकारी संघटना, एखाद्या राजकीय, धार्मिक हेतूने कोणाला भीती घालत असेल किंवा त्यातून धमकी दिली जात असेल तर अशा गोष्टी करणाऱ्या अकाउंटला ब्लॉक केलं जाईल असं फेसबुकने म्हटलं आहे. फेसबुकवर अनेक पेजेस आहेत ज्यावरून खरेदी विक्री केली जाते. यामध्ये जर बंदी असलेल्या वस्तू किंवा पदार्थांची विक्री केल्यास याविरोधात कारवाई केली जाईल. शस्त्रे, बंदूक, दारुगोळा यासारख्या स्फोटक वस्तू विकण्यासाठी फेसबुकचा वापर करण्यास बंदी घातली आहे. सावधान! तुमच्यावर हालचालींवर आहे नजर, फोटो एडिटिंगसाठी अ‍ॅप्स वापरणं धोकादायक हिंसाचार वाढवण्यास मदत करतील अशा पोस्ट करणं, फसवणुकीच्या उद्देशाने केलेल्या पोस्ट, अश्लील फोटो किंवा व्हिडिओ, प्राण्यांचा छळ,  प्राण्यांची तस्करी, त्यांच्या अवयवांची विक्री इत्यादी संदर्भात पोस्ट करणंही फेसबुकच्या नियमात बसत नाही. नवीन फोन खरेदी करण्याआधी 8 गोष्टी लक्षात ठेवा फेसबुक अशा सर्व हालचालींवर नजर ठेवते ज्यामध्ये लोकांना, उद्योगांना, प्राण्यांना नुकसान पोहोचवलं जातं. एखाद्याला त्रास देण्याच्या उद्देशाने पोस्ट केलीत आणि त्याविरुद्ध तक्रार केल्यास तुमचं अकाऊंट फेसबुककडून ब्लॉक केलं जातं. अर्थात पोस्ट आक्षेपार्ह नसल्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. त्यानंतर फेसबुक पुढची कारवाई करतं. मोबाइल गरम होत असेल तर काळजी घ्या, होऊ शकतो स्फोट
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Facebook

    पुढील बातम्या