Home /News /technology /

सावधान! तुमच्यावर हालचालींवर आहे नजर, फोटो एडिटिंगसाठी अ‍ॅप्स वापरणं धोकादायक

सावधान! तुमच्यावर हालचालींवर आहे नजर, फोटो एडिटिंगसाठी अ‍ॅप्स वापरणं धोकादायक

मोबाईल कॅमेऱ्यातून फोटो काढण्यासाठी आणि ते एडिटिंग करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर अनेक अॅप्स आहेत. मात्र, यातून तुमच्या हालचालींवर नजर ठेवली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    नवी दिल्ली, 20 जानेवारी : स्मार्टफोन युजर्ससाठी आता नवीनच धोका समोर आला आहे. फोटो काढताना आणि एडिट करताना वापरण्यात येणाऱ्या अॅप्समधून तुमच्यावर नजर ठेवली जात असल्याचं समोर आलं आहे. तुम्हीही अशी अॅप्स वापरत असाल तर सावध व्हा. सायबर न्यूज रिसर्चने केलेल्या सर्व्हेमध्ये 30 अशा अॅप्सचा शोध लागला आहे ज्यामध्ये मालवेअर कोड असतो. ही अॅप्स फक्त डेटा चोरी करत नाहीत तर युजर्सच्या नकळत त्यांचे लोकेशनसुद्धा ट्रॅक करतात. गूगल प्ले स्टोअरवर ही सर्व अॅप आहेत. संशोधकांनी अहवालात म्हटलं की, या अॅप्लिकेशन्समधून युजर्स डेटा कलेक्ट करून तो विकतात. याशिवाय युजर्सना जाहिराती दाखवून  फिशिंग साइटवर रिडायरेक्ट केलं जातं. अशा जाहिराती असलेली अॅप्स जगभरात 140 कोटी स्मार्टफोनवर डाऊनलोड करण्यात आली आहेत. या अॅप्समध्ये काही पॉप्युलर अॅप्स असून 30 कोटीवेळा डाऊनलोड झाली आहेत. सायबर न्यूजने म्हटलं की, एकूण 30 अॅप्सपैकी 16 अॅप हाँगकाँगमध्ये डेव्हलप करण्यात आली आहेत. रिपोर्टमध्ये अनेक चीनच्या डेव्हलपर्सबद्दल सांगण्यात आलं आहे. या माध्यमातून धोकादायक असेल अँड्रॉइड ट्रोजन पसरवण्याचं काम केलं जातं. गुगल प्ले स्टोअरच्या नियमांचं उल्लंघन या अॅप्सकडून केलं जातं. तसंच डेटा चोरीसह मायक्रोफोन आणि कॅमेरा अॅक्टिव्हेट केले जातात. डेव्हलपर्समध्ये Coocent, KX Camera Team आणि Dream Room यांचा समावेश आहे. सायबर न्यूजने म्हटलं की, डेव्हलपर्स जाहिरातदारांना युजर्सचा डेटा विकून पैसे कमावतात. याशिवाय लाखो युजर्सचे लोकेशन ट्रॅक करून डेव्हलपर्स महिन्याला 4 हजार डॉलर्सची कमाई करतात. वाचा : नवीन फोन खरेदी करण्याआधी 8 गोष्टी लक्षात ठेवा धोकादायक अॅप्स BeautyPlus,  BeautyCam, Beauty Camera, Selfie Camera, Beauty Camera Plus, Beauty Camera- Selfie Camera & Photo Editor, YouCam Perfect, Sweet Snap, Sweet Selfie Snap, Beauty Camera- Selfie Camera with Photo Editor, Beauty Camera- Best Selfie Camera & Photo Editor, B612-Beauty & Filter Camera, Face Makeup Camera & Beauty Photo Makeup Editor, Sweet Selfie- Selfie Camera & Makeup Photo Editor, HD Camera Selfie Beauty Camera, Candy Camera, Pretty makeup, Beauty Photo Editor & Selfie Camera, Bestie- Camera360 Beauty Cam, Photo Editor- Beauty Camera, Photo Editor- Beauty Camera, Beauty Makeup, Selfie Camera Effects & Photo Editor, Selfie Cam- Bestie Makeup Beauty Camera & Filters अशी घ्या काळजी फोटो एडिट करण्यासाठी तसेच त्यात काही वेगवेगळ्या फ्रेम्स अॅड करणे, फिल्टर, इफेक्टसाठी अनेक अॅप्स वापरली जातात. अशी अॅप्स इन्स्टॉल करताना तुमच्या फोटो गॅलरीचा, मायक्रोफोन, कॉन्टॅक्ट, जीपीएस यांचाही अॅक्सेस मागितला जातो. तुम्ही अॅप इन्स्टॉल करण्याच्या गडबडीत त्यांनी विचारलेल्या प्रायव्हसी आणि टर्मकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे नकळत आपण परवानगी देऊन टाकतो. त्यामुळे कोणतेही अॅप इन्स्टॉल करताना आपण कोणत्या गोष्टींचा अॅक्सेस देतो हे काळजीपूर्वक तपासलं पाहिजे. चार्जिंग स्टेशन उघडा आणि करा मोठी कमाई, ही आहे सरकारची योजना
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Android, Google play

    पुढील बातम्या