Home /News /technology /

नवीन फोन खरेदी करण्याआधी 8 गोष्टी लक्षात ठेवा

नवीन फोन खरेदी करण्याआधी 8 गोष्टी लक्षात ठेवा

ऑनलाइन मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींचा विचार करायला हवा.

    मुंबई, 19 जानेवारी: ऑनलाइन शॉपिंग अॅपवर आता प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मोबाईल खरेदी करण्यासाठी चांगल्या ऑफर्स सुरू आहेत. या ऑफरमध्ये अनेक चांगल्या कंपन्यांचे मोबाईल देण्यात आले आहेत. आपण फक्त कॅमेरा किंवा रॅम आणि मोठा डिस्प्ले घेण्याचा विचार करतो. साधारण विचार केला तर तीन वर्ष कमीत कमी चांगला मोबाईल घेतला तर तुम्ही तो वापरू शकता. पण चांगला मोबाईल निवडायचा कसा? हे आधी ठरवता यायला हवं. यासाठी आज आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. बिल्ड क्वालिटी मोबाईलमध्ये बिल्ड क्वालिटीमध्ये दोन प्रकार येतात एक प्लास्टिक बॉडी आणि दुसरी मेटल बॉडी. तुमच्या हातून फोन सतत पडणार असेल तर मेटल बॉडी असणारा फोन घेणं जास्त फायद्याचं ठरेल. प्रोसेसर मोबाईलमध्ये प्रोसेसर महत्त्वाची घटक असतो. प्रत्येक मोबाईलमध्ये दोन प्रोसेसर असतात. थोडक्यात ओक्टाकोअर म्हटलं जातं. Qualcomm Snapdragon 652 किंवा Snapdragon 820/821 असणारे मोबाईल मल्टिटास्कींगसाठी फायदेशीर असतात. प्रोसेसर निवडताना तुमची गरज पाहून निवडावा. रॅम तुम्ही मोबाईलचा किती आणि कसा वापर करणार आहात त्यावर किती रॅमचा मोबाईल घ्यायचा हे अवलंबून आहे. सध्या 8 GB रॅम असणारे उत्तम दर्जाचे फोन बाजारात उपलब्ध आहेत पण तुमचं बजेट कमी असेल तर 4 GB तही तुमचं काम चांगलं चालू शकतं. स्टोरेज सध्या 128 GB इनबिल्ड स्टोरेज असलेले मोबाईल उपलब्ध आहेत. मात्र त्याशिवाय फोनमध्ये तुम्ही मेमरी कार्ड घालून 256 GB वाढवू शकता. मोबाईलमध्ये जेवढा कमी स्टोअरेज ठेवाल तेवढा फोन कमी हँग होईल. त्यामुळे तुम्ही कितीही मोठं स्टोअरेज असलेला मोबाईल घेतला तरीही तो अति भरला की हँग होतोच. डिस्प्ले 5.5 इंचाचा डिस्प्ले हातात बसण्याइतरपत फोन वापरण्याठी पुरेसा असतो.अति मोठे डिस्प्ले असले की मोबाईल हातात मावत नाही. त्यामध्ये मात्र LCD आणि सुपर अॅम्युलेटेड असे दोन प्रकार येतात. LCD डिस्प्ले उन्हामध्ये मोबाईलच्या आत चांगला ब्राइटनेस देतो. अॅम्युलेटेड डिस्प्ले कॉन्ट्रास्ट रंग आणि saturated colors ब्राइटनेस देतो. LCD मध्ये मोबाईलच्या बॅटरीचा वापर जास्त होतो. कॅमेरा आता 64 मेगापिक्सेलपर्यंत कॅमेरा उपलब्ध आहेत. याशिवाय तीन कॅमेरा, चार कॅमेरा असलेले मोबाईलही बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही जर व्हिडिओ शूटिंगसाठी मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर OIS आणि EIS सपोर्टीव्ह आहेत की नाही हे पाहायला हवं. बॅटरी 3000mAh पासून 6000mAh पर्यंत बॅटरी असणारे मोबाईल बाजारात उपलब्ध आहेत. तुमच्या मोबाईलच्या वापरावर आहे. 3000mAh बॅटरी साधारण एक दिवस राहाते. मात्र चार्जिंक कसं आहे ते पाहून घेणं महत्त्वाचं आहे. 15-वाट फास्ट चार्जिंग सपोर्ट असणारा फोन घेतला तर त्याचा फायदा जास्त होतो. 50 टक्के बॅटरी चार्ज झाल्यानंतर फास्ट चार्जिंग होतं. 18 वाट फास्ट चार्जिंग चांगला पर्याय आहे. मात्र तो सगळ्या मोबाईलला सपोर्ट करेलच असं नाही. OS व्हर्जन सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मोबाईलमध्ये Lollipop, Marshmallow, आणि Nougat, अॅन्ड्रॉइड सारखे व्हर्जन उपलब्ध आहेत. युनिक फीचर्स आणि वापरण्यासाठी सोपी असणारी सिस्टीम Android असल्यानं त्याला जगभरात जास्त पसंती आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Amazone, Flipkart, Mobile phone, Techonology

    पुढील बातम्या