मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

मोबाइल गरम होत असेल तर काळजी घ्या, होऊ शकतो स्फोट

मोबाइल गरम होत असेल तर काळजी घ्या, होऊ शकतो स्फोट

तुमचाही मोबाइल गरम होत असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

तुमचाही मोबाइल गरम होत असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

तुमचाही मोबाइल गरम होत असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

  • Published by:  Suraj Yadav

मुंबई, 12 जानेवारी : स्मार्टफोन आता जवळपास प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. त्याच्यामुळे कित्येक कामं सहज होत असली तरी अनेक धोकेही आहेत. सध्या मोबाइलचे स्फोट होण्याचे प्रकार समोर येत आहेत. गरम झाल्यामुळे मोबाइलला आग लागण्याचे किंवा स्फोट होण्याच्या घटना घडत आहेत. मोबाइल गरम होण्यामुळं काही लोकांच्या जीवावरही बेतलं आहे. त्यामुळे तुमचाही मोबाइल गरम होत असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

मोबाइलचा कंपनीने दिलेला चार्जर खराब झाल्यानंतर अनेकदा जवळच्या दुकानात, बाजारात मिळणारा चार्जर खरेदी केला जातो. अशा चार्जरचा फटका बसू शकतो. बॅटरी खराब होण्यास तसंच फोन गरम होण्यासाठी असे चार्जर कारणीभूत ठरतात. त्यामुळे कंपनीच्या ओरिजनल चार्जरचाच वापर कऱणं योग्य ठरेल.

चार्जरप्रमाणेच बॅटरीमध्येही तसंच होताना दिसतं. आता इनबिल्ट बॅटरी असल्यानं डुप्लिकेट बॅटरी वापरण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र जर रिमूव्हेबल बॅटरी असेल तेव्हा ओरिजनल बॅटरीच घेणं फायद्याचं आहे. जास्त वेळ वापर केल्यानंतर बॅटरी गरम होत असेल तर काही वेळासाठी फोन बंद करणे चांगले.

तुमचा फोन ज्वलनशील पदार्थांपासून दूर ठेवा. कपडे, कॉटन, प्लास्टिकपासून बाजूला ठेवा. तसेच शर्टच्या खिशात मोबाइल ठेवणं टाळा. त्यातून निघणारे रेडिएशन शरीरासाठी घातक असतात.

अनेकांना पांघरुणावर, उशाखाली मोबाइल ठेवण्याची सवय असते. यामुळे मोबाइलचे तापमान वाढण्यासोबतच त्याच्यावर दाबही वाढवतो. सोशल मीडियावर अपडेट चेक करत करत झोपी जातात. अशावेळी मोबाइल बंद करणं विसरतात. इंटरनेट, अॅप्स तशीच सुरू राहतात यामुळे मोबाइल गरम होऊ शकतो आणि आगही लागू शकते.

मोबाइल नादुरुस्त झाल्यास त्याची दुरुस्ती अधिकृत सर्विस सेंटरवर करा. कधी कधी जवळच्या दुकानात दुरुस्ती कऱणं महागात पडू शकतं. त्या ठिकाणी ओरिजनल पार्ट मिळतीलच असे नाही. त्यामुळे पुन्हा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो.

वाचा : नववर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या मेसेजमधून आलाय VIRUS, तुमचाही मोबाईल होऊ शकतो हॅक

काही जणांना रात्रभर मोबाइल चार्जिंग करण्याची सवय असते. असं कऱणं धोकादायक ठरू शकते. यामुळे फोन आणि बॅटरी दोन्ही खराब होण्याची शक्यता असते. रात्रभर मोबाइल चार्जिंग कऱण्याएवजी ठराविक वेळ चार्जिंग कऱणे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य असते.

चार्जिंग संपत आल्यावर फोन चार्जिंगला लावून त्याचा वापर करण्याची सवय काही लोकांना असते. तसेच एकाच वेळी अनेक अॅप वापरण्याचीही सवय असते. काहीवेळा मोबाइल चार्जिंगला लावूनच गेम खेळत बसलेले दिसतात. तसंच मोबाइल कॉल सुद्धा केले जातात. अशावेळीही मोबाइल गरम होऊ शकतो तसेच स्फोट होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा गोष्टी टाळा.

First published:

Tags: Mobile