मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Facebook CEO मार्क जुकरबर्ग यांचा फोन नंबर लीक; झाला सर्वात मोठा खुलासा

Facebook CEO मार्क जुकरबर्ग यांचा फोन नंबर लीक; झाला सर्वात मोठा खुलासा

फेसबुकचे सीईओ मार्क जुकरबर्ग यांचा फोन नंबरही फेसबुक युजर्सच्या लीक झालेल्या डेटामध्ये आढळला असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्याबाबत मोठा खुलासा झाला आहे.

फेसबुकचे सीईओ मार्क जुकरबर्ग यांचा फोन नंबरही फेसबुक युजर्सच्या लीक झालेल्या डेटामध्ये आढळला असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्याबाबत मोठा खुलासा झाला आहे.

फेसबुकचे सीईओ मार्क जुकरबर्ग यांचा फोन नंबरही फेसबुक युजर्सच्या लीक झालेल्या डेटामध्ये आढळला असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्याबाबत मोठा खुलासा झाला आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 6 एप्रिल : फेसबुक (Facebook) एक अशी सोशल नेटवर्किंग साईट आहे, ज्यावर फोटो आणि पर्सनल डिटेल्ससह जवळपास प्रत्येक व्यक्तीचं अकाउंट आहे. परंतु यावर पर्सनल डेटा सेफ नसल्याचं आणि त्याचा गैरवापर झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. भारतात फेसबुकच्या 6 मिलियन युजर्ससह डेटा लीक झालेल्यांमध्ये फेसबुकचे CEO मार्क जुकरबर्गही सामिल आहेत. फेसबुकचे सीईओ मार्क जुकरबर्ग यांचा फोन नंबरही फेसबुक युजर्सच्या लीक झालेल्या डेटामध्ये आढळला असल्याची माहिती समोर आली आहे.

एका रिपोर्टनुसार, जुकरबर्ग यांचे इतर डिटेल्स नाव, जन्म तारीख, स्थळ, मॅरेज डिटेल्स आणि फेसबुक युजर आयडीही कॉम्प्रोमाईज्ड केल्या गेलेल्या डेटामध्ये समोर आले आहेत. या लीक झालेल्या डेटानंतर नवी बाब म्हणजे, फेसबुकचे CEO मार्क जुकरबर्ग Signal App चा वापर करत असल्याचा मोठा खुलासा झाला आहे.

एका रिसर्चमध्ये असा खुलासा करण्यात आला की, जुकरबर्ग आपली प्रायव्हसी लक्षात घेता सिग्नल अ‍ॅपचा वापर करतात, ज्यात एंड-टू-एंड एनक्रिप्शनची सिक्योरिटीही आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे अ‍ॅप Facebook कंपनीचं नाही. सिक्योरिटी एक्सपर्ट डेव वॉकरने ट्विटरवर मार्क जुकरबर्ग यांच्या लीक झालेल्या फोन नंबरचा स्क्रिनशॉट पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये असा उल्लेख केला की, 'मार्क जुकरबर्ग सिग्नल अ‍ॅपवर आहेत'. त्याशिवाय दुसऱ्या एका ट्विटमध्ये असंही लिहिलंय की, '533 मिलियन लोकांचा फेसबुक डेटा लीक होण्यासह मार्क जुकरबर्ग यांचेही डिटेल्स लीक झाले आहेत आणि ही मोठी बाब आहे'.

(वाचा - 5 वर्षाहून कमी वय असलेल्या मुलांसाठी बनवा निळं Aadhaar कार्ड, जाणून घ्या प्रोसेस)

533 मिलियन प्रभावित युजर्सपैकी 32 मिलियन अमेरिकेचे युजर्स, 11 मिलियन युके आणि 6 मिलियन भारतीय युजर्स आहेत. लीक डेटामध्ये युजर्सच्या कॉन्टॅक्ट नंबरशिवाय युजर्सचं लोकेशन, संपूर्ण नाव, जन्म तारीख, फेसबुक आयडी आणि ईमेल अ‍ॅड्रेस सामिल आहे.

फेसबुकच्या मालकीची कंपनी WhatsApp च्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे नाराज असलेले अनेक युजर्स सिग्नल आणि टेलिग्रामसारख्या इतर पर्यायांकडे वळत आहेत, त्यादरम्यानच हा खुलासा झाला आहे. व्हॉट्सअ‍ॅपची ही नवी प्रायव्हसी पॉलिसी 15 मे 2021 पासून लागू होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

(वाचा - धक्कादायक! 53.3 कोटी फेसबुक युझर्सचा डेटा लीक; Facebook चं उत्तर पटणारं नाही)

फेसबुकचे इतर को-फाउंडर क्रिस ह्यूस आणि डस्टिन मॉस्कोविट्स यांचा प्रायव्हेट डेटाही या हॅक केलेल्या डेटामध्ये सामिल आहे. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, चोरी करण्यात आलेल्या फोन नंबर्सचा डेटाबेस एका हॅकर्स फोरममध्ये पोस्ट करण्यात आला आहे. आणि हा सहजपणे बेसिक कंप्यूटिंग स्किलवाल्या कोणत्याही व्यक्तीला दिला जाऊ शकतो. आणखी एक सिक्योरिटी एक्सपर्ट एलोन गॅल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा डेटा 2020 मध्येच लीक केला होता, जो प्रत्येक फेसबुक अकाउंटशी जोडलेला फोन नंबर पाहण्यास सक्षम होता.

First published:

Tags: CEO, Facebook, Signal, Whatsapp