नवी दिल्ली, 7 जून : गुगल क्रोम युजर्ससाठी (Google Chorme) चांगली बातमी आहे. आता गुगल क्रोमची सिक्योरिटी वाढवण्यात येणार आहे. यामुळे युजर्सचा हार्मफुल डाउनलोड किंवा एक्सटेंशनपासूनही बचाव होईल. यासाठी नवं फीचर जारी केलं जाणार आहे. या फीचरद्वारे हार्मफुल डाउनलोड किंवा एक्सटेंशनबाबत Chorme माहिती करू शकतो. हे नवं फीचर Enhanced Safe Browsing चा एक भाग आहे.
Google चं नवं सेफ्टी फीचर -
Enhanced Safe Browsing मुळे गुगल क्रोम रिस्की फाईल डाउनलोड करण्यावेळी अधिक प्रोटेक्शन ऑफर करेल. त्याशिवाय एक स्कॅनिंग टूलही लाँच केलं जाईल. याच्या मदतीने डाउनलोडिंगच्या आधीच धोकादायक फाईलची सूचना मिळेल. हे फीचर गेल्या वर्षी सुरक्षित ब्राउजिंगसाठी लाँच करण्यात आलं होतं. या फीचरमध्ये आता एडिशन प्रोटेक्शन दिलं जात आहे. अशात जर तुम्ही Chorme वेब स्टोरवरुन नवं एक्सटेंशन इन्स्टॉल कराल, त्यावेळी डायलॉग बॉक्स दिसेल, जो सांगेल की जे एक्सटेंशन तुम्ही इन्स्टॉल करत आहात, ते सुरक्षित आहे की नाही.
फाईल होणार स्कॅन -
अधिक एनालिसिससाठी Google Safe Browsing वर फाईल अपलोड केली जाईल. जर फाईल अनसेफ असेल, तर गुगल याबाबत इशारा देईल. हे ऑप्शनल आहे, युजर्स स्कॅन न करताही फाईल डाउनलोड करू शकतात.
ब्राउजर अधिक सिक्योर -
Google नुसार, Enhanced Safe Browsing युजर्सला इतर ब्राउजिंगच्या तुलनेत 35 टक्के अधिक सिक्योर आहे. कंपनीने गुरुवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं, की Chrome 91 पासून सुरू होऊन आम्ही चांगल्या सुरक्षित ब्राउजिंगसाठी युजर्सला आपलं एक्सटेंशन निवडण्यास मदत करण्यासाठी नवीन सुविधा रोलआउट करत आहोत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.