नवी दिल्ली, 7 जून : प्रत्येक स्मार्टफोन युजर इमोजीचा (Emoji) वापर करतो. चॅट करताना, सोशल मीडियावर अनेकदा लोक इमोजीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. परंतु जर तुम्हाला विचारलं जगातील सर्वात आवडता इमोजी कोणता, तर तुम्ही विचारात पडाल. पण आनंदाश्रूसह आनंदाने खळखळून हसणारा इमोजी (face with tears of joy emoji) जगातील सर्वात आवडता इमोजी ठरला आहे. अमेरिकेतील मिशिगन यूनिव्हर्सिटी आणि चीनच्या पिकिंग विविद्वारा 212 देशांच्या 4.27 कोटी मेसेजच्या आधारे हे रिसर्च करण्यात आलं असून त्यातून हा इमोजी सर्वात आवडीचा असल्याचं समोर आलं आहे.
रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या खंडांमध्ये राहणाऱ्या वेगवेगळ्या संस्कृतीतील लोकांनी आनंदाच्या अश्रूसह खळखळून हसणाऱ्या इमोजीचा सर्वात जास्त वापर केला आहे. या इमोजीचा वापर संपूर्ण जगात केला जातो.
या खळखळून हसणाऱ्या इमोजीनंतर दुसऱ्या क्रमांकावर हार्ट इमोजी आणि तिसऱ्या क्रमांकावर हार्ट आईज इमोजीचा नंबर आहे. रिसर्चनुसार, फ्रेंचमधील लोक सर्वात जास्त हार्ट इमोजीचा वापर करतात. जर अमेरिकन आणि रशियन लोकांची पहिली पसंती हसणाऱ्या इमोजीला आहे. रिसर्चनुसार, जे लोक स्वत:मध्ये मस्त राहतात, आनंदी असतात ते हॅप्पी इमोजीचा सर्वाधिक वापर करतात. या लिस्टमध्ये ऑस्ट्रेलिया, फ्रान्ससारख्या देशांचा समावेश आहे.
इमोजी पिवळ्या रंगाचेच का असतात -
विशेषज्ञांनी इमोजीचा रंग पिवळाच असण्यामागे कारण सांगितलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमोजीचा रंग व्यक्तीच्या स्किन टोनशी अतिशय मिळता-जुळता आहे. त्यामुळे तो पिवळ्या रंगाचा असतो. असंही म्हटलं जातं, की पिवळ्या रंगावर हसण्याचा भाव अधिक प्रमाणात अभिव्यक्त होतो.
तर दुसरीकडे, लोक ज्यावेळी खळखळून हसतात, त्यावेळी त्यांचा चेहराही हसून-हसून पिवळा पडतो. हेदेखील यामागचं कारण असल्याचं सांगितलं जातं, त्यामुळेच इमोजीचा रंग पिवळा असतो. पिवळा रंग हसतं-खेळतं आणि आनंदाचं प्रतिक आहे. पिवळ्या रंगात इमोशन्स अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news