Home /News /technology /

आता Smartphone वर करता येईल कमाई, या Apps चा वापर करुन पैसे कमावण्याची संधी

आता Smartphone वर करता येईल कमाई, या Apps चा वापर करुन पैसे कमावण्याची संधी

घरबसल्या पैसे कमावण्याच्या Apps मध्ये फिटनेसपासून मार्निंग वॉकपर्यंतच्या (top money earning apps without investment) कामांसाठी युजर्सला पैसे देण्यात येत आहे. असे काही अ‍ॅप्स आहेत ज्याद्वारे कमाई करता येऊ शकते.

    नवी दिल्ली, 1 जुलै : सध्याच्या काळात इंटरनेट आणि स्मार्टफोन प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे जवळपास सर्वच गोष्टी ऑनलाइन करता येतात. आता स्मार्टफोनमधील काही अ‍ॅप्सच्या (unlimited earn money apps download) माध्यमातून युजर्सला घरबसल्या पैसेही कमावता येणार आहे. घरबसल्या पैसे कमावण्याच्या Apps मध्ये फिटनेसपासून मार्निंग वॉकपर्यंतच्या (top money earning apps without investment) कामांसाठी युजर्सला पैसे देण्यात येत आहे. असे काही अ‍ॅप्स आहेत ज्याद्वारे कमाई करता येऊ शकते.

    नवा फोन घ्यायचाय? दमदार बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळतायेत हे Smartphone

    Step Set Go - हे एक मोबाइल फिटनेस रिवार्ड प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे युजरला आपल्या स्टेप्सला क्रेडिटमध्ये बदलता येऊ शकतं. त्याचबरोबर (money earning apps in India) त्यावर देण्यात येणाऱ्या लाइफस्टाइल रिवार्ड्सलाही रिडिम करता येते. त्यामुळे या App च्या माध्यमातून चांगली रक्कम कमावता येऊ शकते. Paid To Go - ही एक Run Tracker App आहे, ज्यावर केवळ चालण्यासाठी पैसे देण्यात येतात. हे पैसे युजर्सला कॅश किंवा बिटकॉइन्समध्ये देण्यात येतात. त्यामुळे या App चा फायदा युजर्सला चांगली कमाई करण्यासाठी नक्कीच होऊ शकतो.

    Smartphone मधील स्टोरेज फुल झाल्यामुळं त्रस्त आहात? त्यासाठी अशी घ्या काळजी

    Grofitter - या भारतीय अ‍ॅपच्या माध्यमातून युजर्सला आपला फिटनेस मेंटेन करण्यासाठी पैसे देण्यात येत आहे. त्यासाठी युजरला यात झुम्बा, सायकलिंग आणि वॉकिंग करून पैसे कमावण्याचा पर्याय देण्यात आला आहे. Yodo - योडो ही एक फ्री स्पोर्ट्स आणि हेल्थ Management अ‍ॅप आहे. ज्याद्वारे युजरला फिटनेस राखण्यासाठी पैसे देण्यात येत आहे. त्यात वॉकिंग, रनिंग आणि Hiking करण्यासाठी युजर्सला रिवॉर्ड देण्यात येतात.

    रिचार्ज संपला तरी आता नो टेन्शन! Jio देणार काही सेकंदात Data Loan

    Stepbook - हे फिटनेसशी संबंधित एक Mobile App आहे, ज्याद्वारे युजर्सच्या स्टेप्स ट्रॅक करून त्याला Stepbucks मध्ये कन्व्हर्ट करण्यात येतं आणि त्याद्वारे पैसे देण्यात येतात. Rantopia - हे GPS वर चालणारं App असून यात युजरला त्याच्या फिटनेस स्टेप्सला ट्रॅक आणि Analyze करता येतात. ज्यानंतर युजर्सला SPC कॉइन्सच्या रुपात पैसे मिळू शकतात. (News18 लोकमत या माहितीची पुष्टी करीत नाही.)
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Apps, Fitness, India, Money

    पुढील बातम्या