Home /News /technology /

सावधान! ऑनलाइन शॉपिंग करताना नकली सामान देऊन होतेय फसवणूक, वाचा अशावेळी काय कराल

सावधान! ऑनलाइन शॉपिंग करताना नकली सामान देऊन होतेय फसवणूक, वाचा अशावेळी काय कराल

ऑनलाईन शॉपिंगदरम्यान मिळणाऱ्या मोठ्या डिस्काउंट्समुळे अनेकजण अशा सेलमध्ये शॉपिंग करतात. परंतु इलेक्ट्रॉनिक्स, ब्रॅन्डेड फुटवेयर किंवा खाण्या-पिण्याचं सामान खरेदी करताना, खरेदीदार म्हणून सतर्क राहण्याची गरज आहे.

    नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : ई-कॉमर्स कंपन्यांकडून फेस्टिव्ह सेलची (Festive Sale)सुरुवात करण्यात आली आहे. जर तुम्हीही शॉपिंग लिस्ट तयार केली असेल तर खरेदी करताना थोडी सावधगिरी बाळगा. ऑनलाईन शॉपिंग करताना सावध राहा कारण या दरम्यान नकली सामानाचीही विक्री केली जाण्याची शक्यता आहे. ऑनलाईन शॉपिंगदरम्यान मिळणाऱ्या मोठ्या डिस्काउंट्समुळे अनेकजण अशा सेलमध्ये शॉपिंग करतात. परंतु इलेक्ट्रॉनिक्स, ब्रॅन्डेड फुटवेयर किंवा खाण्या-पिण्याचं सामान खरेदी करताना, खरेदीदार म्हणून सतर्क राहण्याची गरज आहे. ऑथेंटिकेशन सॉल्यूशन प्रोव्हाईडर असोसिएशननुसार, या कॅटेगरीमध्ये नकली सामान अतिशय हुशारीने विकलं जाऊ शकतं. ऑथेंटिक वेबसाईटवरूनच शॉपिंग करा - ऑथेंटिकेशन सॉल्यूशन प्रोव्हाईडर असोसिएशनचे अध्यक्ष नकुल पसरीचा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑफर्सच्या जाळ्यात अडकू नका. वेबसाईट किती ऑथेंटिक आहे हे तपासा. अनेकदा ऑफर्सशी जोडलेल्या वेबसाईट्स खोट्या वेबसाईट प्लॅटफॉर्मवर पोहचवतात, त्यामुळे सतर्क राहा. हे वाचा - Tricks and Tips: Google प्ले स्टोरमध्ये करा या 3 सेटिंग्स; बॅटरीसह डेटाचीही बचत पार्सल ओपन करताना रेकॉर्डिंग - ऑनलाईन पार्सल घरी आल्यानंतर, पार्सल ओपन करताना मोबाईलमध्ये त्याचं रेकॉर्डिंग करा. रेकॉर्डिंगमुळे सामान नकली किंवा डिफेक्टिव्ह आल्यास रिटर्न करताना सोपं होतं. क्यूआर कोड आणि होलोग्राम स्टीकरवरूनही वस्तू बनावट आहे की नाही हे तपासता येऊ शकतं. हे वाचा - 300 रुपयांहूनही कमी किंमतीत सुपरहिट प्लान्स; 4 जीबी डेटासह फ्री सब्सक्रिप्शनही ब्रँडची स्पेलिंग आणि पॅकेजिंग - मिठाई, स्नॅक्स किंवा चॉकलेट हँपर ऑनलाईन खरेदी करताना, ज्या ब्रँडचं प्रोडक्ट आहे त्याचं स्पेलिंग आणि पॅकेजिंग योग्यरित्या तपासा. यासाठी फूड रेगुलेटर एफएसएसएआयच्या (FSSAI) स्मार्ट कंज्यूमर ऍपचीही मदत घेता येऊ शकते. हे वाचा - आता Paytm वरून पेमेंट करणं महागणार... एका अंदाजानुसार, 2018-19 मध्ये ऑनलाईन सामानाच्या नकली विक्रीच्या प्रकारात 24 टक्क्यांची वाढ झाली आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी कोरोनामुळे ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे. त्यामुळे फसवणूकीची अधिक शक्यता आहे. त्यामुळे ऑनलाईन स्वस्त सामानाच्या शॉपिंगदरम्यान सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    पुढील बातम्या