300 रुपयांहूनही कमी किंमतीत सुपरहिट प्लान्स; 4 जीबी डेटा, फ्री कॉलिंगसह फ्री सब्सक्रिप्शनही

300 रुपयांहूनही कमी किंमतीत सुपरहिट प्लान्स; 4 जीबी डेटा, फ्री कॉलिंगसह फ्री सब्सक्रिप्शनही

टेलिकॉम कंपन्यांकडून युजर्सला अनेक प्लानद्वारे ऑफर्स देण्यात येत आहेत. रिलायन्स जीओ, एयरटेल, वोडाफोन-आयडियाचे (Vi) काही हिट प्लान्स देण्यात येत आहेत.

  • Share this:

मुंबई, 16 ऑक्टोबर : टेलिकॉम कंपन्यांकडून युजर्सला अनेक प्लानद्वारे ऑफर्स देण्यात येत आहेत. रिलायन्स जीओ, एयरटेल, वोडाफोन-आयडियाचे (Vi) काही हिट प्लान्स देण्यात येत आहेत. टेलिकॉम कंपन्या दररोज 4 जीबी डेटासह फ्री कॉलिंग ऑफर देत आहेत. हे सुपरहिट प्लान 300 रुपयांहून कमी किंमतीत उपलब्ध आहेत.

299 रुपये वोडाफोन-आयडिया प्लान -

वोडाफोन-आयडिया अर्थात Vi युजर्ससाठी 299 रुपयांचा सुपरहिट प्लान देण्यात आला आहेत. या प्लानमध्ये दररोज 2 जीबी डेटा देण्यात येत आहे. परंतु सध्या कंपनी या प्लानवर डबल डेटा ऑफर करतेय. आता हा प्लान रिचार्ज करणाऱ्या युजर्सला दररोज 4 जीबी डेटा मिळतोय. हा प्लान अनलिमिटेड फ्री कॉलिंग बेनिफिटसोबत आहे. वोडाफोन-आयडियाच्या (Vi)या प्लानची वैधता 28 दिवस आहे, ज्यात 100 फ्री एसएमएसही आहेत.

एयरटेल 298 रुपये प्लान -

या प्लानमध्ये रोज 2 जीबी डेटा मिळतोय. या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. ज्यात देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करण्याची सुविधा आहे. एयरटेलच्या या प्लानमध्ये रोज 100 फ्री एसएमएस आणि एयरटेल एक्सट्रीम प्रीमियम आणि विंक म्युझिक सब्सक्रिप्शनही फ्री मिळते आहे. या प्लानच्या सब्सक्रायबर्सला FASTagच्या खरेदीवर 150 रुपये कॅशबॅश मिळतोय.

रिलायन्स जीओ 249 रुपये प्लान -

रिलायन्स जीओचा हा प्लान 28 दिवसांच्या वॅलिडिटीसह येतो. ज्यात युजर्सला दररोज 2 जीबी डेटा मिळतोय. या प्लानसह जीओ नेटवर्क्ससाठी अनलिमिटेड कॉलिंग आहे. तर दुसऱ्या नेटवर्क्ससाठी या प्लानमध्ये 1000 FUP मिनिट्स मिळतात. रोज 100 फ्री एसएमएससह या प्लानमध्ये जीओ ऍप्सचं सब्सक्रिप्शनही मिळतंय.

Published by: Karishma Bhurke
First published: October 16, 2020, 10:35 AM IST

ताज्या बातम्या