Tricks and Tips: Google प्ले स्टोरमध्ये करा या 3 सेटिंग्स; बॅटरीसह डेटाचीही होईल बचत
Tricks and Tips: Google प्ले स्टोरमध्ये करा या 3 सेटिंग्स; बॅटरीसह डेटाचीही होईल बचत
अनेकदा अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये काही अशा सेटिंग्स दिलेल्या असतात ज्याबद्दल अनेकांना माहिती नसते. सेटिंग्समध्ये काही बदल करून बॅटरी आणि डेटाची बचत केली जाऊ शकते.
मुंबई, 16 ऑक्टोबर : दिवसभर सतत मोबाईलचा वापर होत असल्यास मोबाईलची बॅटरी आणि डेटाही लवकर संपतो. परंतु अनेकदा अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये काही अशा सेटिंग्स दिलेल्या असतात ज्याबद्दल अनेकांना माहिती नसते. सेटिंग्समध्ये काही बदल करून बॅटरी आणि डेटाची बचत केली जाऊ शकते.
प्ले स्टोर सेटिंग्समध्ये बदल -
यासाठी प्ले स्टोर सेटिंग्समध्ये 'ऑटो अपडेट ऍप्स'वर जा. त्यानंतर 'डोन्ट ऑटो अपडेट ऍप्स'ला सिलेक्ट करा. 'ओवर एनी नेटवर्क'ला सिलेक्ट केल्यामुळे, ज्यावेळी ऍप अपडेट येईल त्यावेळी, ते ऑटो अपडेट होईल. यामुळे डेटा आणि बॅटरी लवकर संपते.
फोन बॅटरी -
प्ले स्टोरचा अधिक वापर होत असल्यास फोनची बॅटरी लवकर संपते. अशावेळी सेटिंग्समध्ये 'थीम'वर क्लिक करून 'सेट बाय बॅटरी सेव्हर'ला सिलेक्ट करा. या सेटिंगमुळे प्ले स्टोर वापरताना बॅटरी कमी डिस्चार्ज होईल.
पासवर्ड -
अनेकदा फोनमध्ये ऍप ऑटोमेटिक इंस्टॉल होतात. त्यामुळेही बॅटरी आणि डेटा लवकर संपतो. त्यासाठी सेटिंगमध्ये 'पॅरेंटल कंट्रोल'मध्ये जाऊन, ते ऑन केल्यावर 4 अंकी पासवर्ड टाकावा लागेल. पासवर्ड सेट झाल्यानंतर, प्ले स्टोर ओपन करताना पासवर्ड विचारला जाईल. यामुळेही बॅटरी कमी डिस्चार्ज होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.