जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / आता Paytm वरून पेमेंट करणं महागणार...

आता Paytm वरून पेमेंट करणं महागणार...

आता Paytm वरून पेमेंट करणं महागणार...

कंपनीने नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यानंतर आता युजर्ससाठी पेटीएम महाग होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : ग्रॉसरी स्टोर्समधून सामान भरण्यासाठी, पाणी-लाईट बिल भरण्यासाठी, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी, मोबाईल-डिटीएच रिचार्ज, ऑनलाईन ऑर्डर अशा अनेक गोष्टींसाठी पेटीएम वॉलेटचा (Paytm Wallet) वापर अनेक जण करतात. पण आता युजर्ससाठी पेटीएम महाग होणार आहे. आतापर्यंत क्रेडिट कार्डमधून पेटीएम वॉलेटमध्ये मनी लोड केल्यानंतर कोणताही चार्ज द्यावा लागत नव्हता. पण आता कंपनीने नियमांमध्ये काही बदल केले आहेत. paytmbank.com/ratesCharges वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, 15 ऑक्टोबर 2020 पासून एखाद्या युजरने पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डमधून मनी ऍड केल्यास, त्याला 2 टक्के अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे. या 2 टक्के चार्जमध्ये जीएसचीचा समावेश असणार आहे. उदा. जर तुम्ही क्रेडिट कार्डने पेटीएम वॉलेटमध्ये 100 रुपये टाकले, तर तुमच्या क्रेडिट कार्डमधून 102 रुपयांचं पेमेंट करावं लागणार आहे. हा नियम आधी 9 ऑक्टोबरपासून लागू होणार होता.

कोरोनाच्या संकटात Flipkart देतेय विद्यार्थ्यांना नोकरीची संधी, येथे करा अर्ज

paytm Tricks and Tips: Google प्ले स्टोरमध्ये करा या 3 सेटिंग्स; बॅटरीसह डेटाचीही बचत दरम्यान, क्रेडिट कार्डमधून पेटीएममध्ये पैसे ऍड केल्यानंतर कंपनीकडून सध्या 1 टक्के कॅशबॅक दिला जात आहे. मर्चेंट साईटवर पेटीएममधून पेमेंट केल्यानंतर कोणताही एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागणार नाही. पेटीएम टू पेटीएम वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर केल्यास कोणताही चार्ज लागणार नाही. तसंच डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंगद्वारे पेटीएम वॉलेटमध्ये पैसे ऍड केल्यासही कोणताही चार्ज भरावा लागणार नाही.

गायीच्या शेणापासून बनवलेली चीप लॉन्च; मोबाईल राहणार रेडिएशन फ्री

यापूर्वी कंपनीने 1 जानेवारी 2020 लाही नियमांमध्ये काही बदल केले होते. कोणत्याही ग्राहकाने 10 हजार रुपयांपर्यंतची रक्कम क्रेडिट कार्डने वॉलेटमध्ये ऍड केल्यास, कोणताही चार्ज नव्हता. 10 हजारहून अधिक पैसे ऍड केल्यास 2 टक्के चार्ज होता. परंतु आता क्रेडिट कार्डमधून कितीही रुपये पेटीएम वॉलेटमध्ये ऍड केल्यास 2 टक्के चार्ज लागणार आहे.

आता तुम्हाला 1 रुपयाचं नाणं करणार लखपती, घरबसल्या कमावू शकता 25 लाख

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात