• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • आजपासून Driving License संबंधीच्या नियमांत बदल; टेस्टसाठी फॉलो करावे लागणार हे नियम

आजपासून Driving License संबंधीच्या नियमांत बदल; टेस्टसाठी फॉलो करावे लागणार हे नियम

सरकारने ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी अनेक सुविधा ऑनलाईन केल्या आहेत. त्यामुळे घरबसल्या अनेक काम केली जाऊ शकतात.

  • Share this:
    नवी दिल्ली, 1 जुलै: आज 1 जुलैपासून ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी (Driving License) नियमांत बदल झाले आहेत. मागील अनेक दिवसांपासून सरकारने लायसन्स बनवण्याच्या प्रक्रियेत तसंच यासंबंधी समस्या सोडवण्यासाठी अनेक पाऊलं उचलली आहेत. सरकारने ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी अनेक सुविधा ऑनलाईन केल्या आहेत. त्यामुळे घरबसल्या अनेक काम केली जाऊ शकतात. वाहतूक मंत्रालयाने लायसन्स बनवण्यासाठी एक नियम केला आहे, यामुळे आता रजिस्टर्ड ड्रायव्हिंग सेंटर्समधून (Driving Centres) यशस्वीरित्या ट्रेनिंग पूर्ण करणाऱ्या लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट (Driving Test) द्यावी लागणार नाही. ज्या ड्रायव्हिंग स्कूलमधून व्यक्ती ट्रेनिंग घेईल, ते ड्रायव्हिंग सेंटर पूर्णपणे मान्यताप्राप्त असणं गरजेचं आहे. या सेंटरमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट पास झाल्यानंतरच लायसन्स मिळेल. या प्रक्रियेमुळए RTO मध्ये फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. ड्रायव्हिंग लायसन्ससाठीचा हा नियम आजपासून लागू झाला आहे.

    (वाचा - वाहनचालकांनो लक्ष द्या! Driving License आणि PUC सर्टिफिकेट बाबत ही अपडेट वाचली का?)

    ड्रायव्हिंग सेंटर्ससाठी गाइडलाइन्स - ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टची पूर्ण प्रोसेस ऑडिटसाठी इलेक्ट्रॉनिक रुपात रेकॉर्ड केली जाईल. विशेष बाब म्हणजे, ड्रायव्हिंग टेस्टसाठी अशाच ट्रेनिंग सेंटर्सला मान्यता दिली जाईल, जे गाइडलाइन्सचं पालन करतील.

    (वाचा - कारमध्ये हे मॉडिफिकेशन केलं? द्यावा लागेल मोठा दंड,वाचा वाहतुकीच्या या नियमाबाबत)

    या गाइडलाइन्समध्ये ड्रायव्हिंग सेंटर्सकडे जागा, ड्रायव्हिंग ट्रॅक आणि बायोमेट्रिक सारख्या फॅसिलिटी असणं आवश्यक आहे. ड्रायव्हिंग सेंटर्सनी या नियमांचं पालन न केल्यास त्यांना मान्यता दिली जाणार नाही. तसंच एखाद्याने मान्यता नसलेल्या ड्रायव्हिंग सेंटरमधून टेस्ट पास केली, तरी त्याला लायसन्स दिलं जाणार नाही.
    Published by:Karishma
    First published: