जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / तुमच्या कारमध्ये हे मॉडिफिकेशन केलं असल्यास द्यावा लागेल मोठा दंड, वाचा वाहतुकीच्या या नियमाबाबत

तुमच्या कारमध्ये हे मॉडिफिकेशन केलं असल्यास द्यावा लागेल मोठा दंड, वाचा वाहतुकीच्या या नियमाबाबत

तुमच्या कारमध्ये हे मॉडिफिकेशन केलं असल्यास द्यावा लागेल मोठा दंड, वाचा वाहतुकीच्या या नियमाबाबत

सरकारकडून बॅन असतानाही काही चालक आपल्या कारमध्ये बुल बारचा वापर करत होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा वाहतूक पोलीस आणि प्रशासन याविरोधात कठोर मोहीम राबवत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 1 जुलै: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) कारमध्ये मॉडिफिकेशन (Car Modification) करण्याबाबतचे नियम अधिक कडक केले आहेत. जर कार चालकांनी हे नियम मोडले तर मोठा दंड भरावा लागू शकतो. तसंच शिक्षाही होऊ शकते. 2017 मध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने कारमध्ये फ्रंटला लावण्यात येणारा बुल बार (Bull Bar) बॅन केला होता. सरकारकडून बॅन असतानाही काही चालक आपल्या कारमध्ये याचा वापर करत होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा वाहतूक पोलीस आणि प्रशासन याविरोधात कठोर मोहीम राबवत आहे. अशा चालकांवर चालान कारवाईसह इतर गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत. जाणून घ्या बुल बार वापरल्याने काय होतं? यामुळे कसं नुकसान होतं, तसंच बुल बार लावल्यास किती दंड, शिक्षा होईल? कार बुलबार - बुल बार कारच्या फ्रंटला लावला जातो. कार युजर्स आपल्या सेफ्टीसाठी याचा वापर करण्याचा विचार करतात. परंतु एखादा अपघात झाल्यास, त्यावेळी या बुल बारमुळे एअरबॅग्स (Airbags) ओपन होण्यास समस्या येतात. यामुळे अपघातावेळी गंभीर जखमी होण्याची शक्यता निर्माण होते. तसंच रस्त्यावरुन पायी चालणाऱ्या लोकांसाठीही बुल बार धोकादायक ठरतो. त्यामुळे सरकारने कारमध्ये वापरला जाणारा बुल बार बॅन केला आहे.

(वाचा -  ऑनलाईन पॉर्न पाहता? Google, FB ची तुमच्यावर नजर, असा ट्रॅक होतो तुमचा डेटा )

दंड आणि शिक्षेची तरदूत - जर तुमच्या कारवर अजूनही बुल बार असेल, तर मोटर वाहन कायद्याच्या कलम 182 A (4) अंतर्गत तुम्ही दोषी ठरता. यामुळे वाहतूक पोलीस किंवा प्रशासन तुम्हाला पाच हजारांचा दंड करू शकतात. त्याशिवाय सहा महिन्यांची शिक्षाही होऊ शकते. दंड होऊ द्यायचा नसल्यास, त्वरित आपल्या कारला असलेला बुलबार हटवावा लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात