Home /News /technology /

वाहनचालकांनो लक्ष द्या! Driving License आणि PUC सर्टिफिकेट बाबत ही अपडेट वाचली का?

वाहनचालकांनो लक्ष द्या! Driving License आणि PUC सर्टिफिकेट बाबत ही अपडेट वाचली का?

वाहनांच्या आवश्यक कागदपत्रांची वैधता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत ग्राह्य धरण्याच्या सूचना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केल्या आहेत. मात्र यातली महत्त्वाची गोष्ट अशी, की वाहनांशी संबंधित सर्वच कागदपत्रांच्या वैधतेला ही मुदतवाढ लागू नाही.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 21 जून : कोविड-19 चा (Covid19) संसर्ग आटोक्यात राखण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे उपाय राबवले जात आहेत. गेल्या वर्षी देशव्यापी लॉकडाउन (Lockdown) लागू करण्यात आला होता, मात्र यंदा तसा लॉकडाउन नाही. लॉकडाउन लावण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत. लोकांनी कमीत कमी कारणांसाठी घराबाहेर पडावं, यासाठीही वेगवेगळे उपाय राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने वाहनविषयक कागदपत्रांच्या (Vehicle Documents) वैधतेला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 'लाइव्ह मिंट'ने दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) अर्थात वाहन चालवण्याचा परवाना, व्हेईकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अर्थात वाहन नोंदणी सर्टिफिकेट (RC Book), वाहनाचं फिटनेस सर्टिफिकेट (Fitness Certificate) या कागदपत्रांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा अर्थ असा, की वरीलपैकी कोणत्याही कागदपत्रांची मुदत 1 फेब्रुवारी 2020 नंतर संपली असेल किंवा 30 सप्टेंबर 2021 पर्यंत संपणार असेल, तर ती कागदपत्रं 30 सप्टेंबरपर्यंत वैधच राहणार आहेत. या कालावधीत कोणाच्या कागदपत्रांची मुदत संपली असेल, तरी त्यांना दंड करू नये, त्यांची आधीची कागदपत्रं ग्राह्य धरावीत, अशा सूचना केंद्रीय परिवहन मंत्रालयाने जारी केल्या आहेत. मोटार वाहन कायदा 1988 नुसार (Motor Vehicle Act 1988) आवश्यक कागदपत्रांची वैधता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत ग्राह्य धरण्याच्या सूचना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केल्या आहेत. मात्र यातली महत्त्वाची गोष्ट अशी, की वाहनांशी संबंधित सर्वच कागदपत्रांच्या वैधतेला ही मुदतवाढ लागू नाही. वरील कालावधीत PUC (Pollution Under Control) सर्टिफिकेटची वैधता संपली असेल, तर नवं PUC सर्टिफिकेट घेणं बंधनकारक आहे. वैध PUC सर्टिफिकेट नसेल तर पोलीस दंडाची कारवाई करू शकतात.

(वाचा - देशातील सर्वात स्वस्त कार वेरिएंट, जबरदस्त फीचर्ससह मिळेल 22 किमीपर्यंतच मायलेज)

ट्रान्स्पोर्ट सेवा, तसंच सर्वसामान्य प्रवासी यांना या कागदपत्रांच्या कारणावरून कोणताही त्रास दिला जाऊ नये, याची काळजी घेण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत.

(वाचा - Electric टू व्हिलर्सच्या किमतीत होणार मोठी कपात; हे आहे कारण)

अलीकडेच केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्यांचा त्रास काहीसा कमी केला आहे. उच्च दर्जाचं ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण केंद्रातली चाचणी ज्या व्यक्तींनी पूर्ण केली असेल, त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळवताना पुन्हा चाचणी द्यावी लागणार नाही, अशी घोषणा सरकारने अलीकडेच केली होती.
Published by:Karishma Bhurke
First published:

Tags: Driving license, While driving

पुढील बातम्या