मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Alert! तुम्हीही Domino’s मधून ऑर्डर केलाय पिझ्झा? बँक अकाउंट धोक्यात, पाहा डिटेल्स

Alert! तुम्हीही Domino’s मधून ऑर्डर केलाय पिझ्झा? बँक अकाउंट धोक्यात, पाहा डिटेल्स

डोमिनोज इंडियाचा गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात डेटा लीक झाला होता, ज्यात फोन नंबर, नाव, क्रेडिट कार्डसह पेमेंट डिटेल्स सारखी माहिती लीक करण्यात आली होती.

डोमिनोज इंडियाचा गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात डेटा लीक झाला होता, ज्यात फोन नंबर, नाव, क्रेडिट कार्डसह पेमेंट डिटेल्स सारखी माहिती लीक करण्यात आली होती.

डोमिनोज इंडियाचा गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात डेटा लीक झाला होता, ज्यात फोन नंबर, नाव, क्रेडिट कार्डसह पेमेंट डिटेल्स सारखी माहिती लीक करण्यात आली होती.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 24 मे : एअर इंडियानंतर आता पिझ्झा डिलीव्हरी चेन डोमिनोज इंडियाचा (Domino’s India) डेटा लीक झाला आहे. एका रिपोर्टनुसार, 18 कोटीहून अधिक ऑर्डरचा डेटा (Data Leak) लीक झाल्याची माहिती आहे. हा लीक डेटा सर्चसाठी उपलब्ध डेटाबेस रुपात विक्रीसाठी डार्क वेबवर ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे हॅकर्स आपल्या वेरिफाईड लोकेशनवरुन युजर्सला ट्रॅक आणि ट्रेस करू शकतात.

रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, डोमिनोज इंडियाचा गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात डेटा लीक झाला होता, ज्यात फोन नंबर, नाव, क्रेडिट कार्डसह पेमेंट डिटेल्स सारखी माहिती लीक करण्यात आली होती. सायबर सिक्योरिटी फर्म हडसन रॉकचे एलोन गॅल यांनी याबाबत माहिती देत, हा डेटा 4.5 कोटी रुपयांना (10 बिटकॉइन) विक्री करण्यात आल्याचं सांगितलं आहे. क्रेडिट कार्ड डिटेल्स लीक झाल्यामुळे, ग्राहकांचं बँक अकाउंट (Bank Account) धोक्यात असल्याची माहिती आहे.

(वाचा - तुमचं Account, Password सुरक्षित कसं ठेवाल? Google ने सांगितल्या खास टिप्स)

तुमचाही डेटा लीक होण्याची शक्यता -

सायबर सिक्योरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया यांनी ट्विट करत सांगितलं, की 'डोमिनोज इंडियाच्या 18 कोटी ऑर्डरचा डेटा पब्लिक झाला आहे. हॅकर्सनी डार्क वेबवर याचं एक सर्च इंजिन बनवलं आहे. जर तुम्ही कधीही डोमिनोज इंडियामधून ऑनलाईन ऑर्डर केली असेल, तर तुमचा डेटा लीक होऊ शकतो.'

तसंच, या डेटा ब्रीचचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे, हॅकर्स या डेटाचा उपयोग लोकांवर हेरगिरी करण्यासाठी करत आहे. कारण कोणताही व्यक्ती, ज्याच्याकडे दुसऱ्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आहे, तो डेट आणि टाईमसह आपल्या मागील लोकेशनची माहिती मिळवू शकतो. हा सिक्योरिटीसाठी मोठा धोका आहे, असा खुलासाही राजहरिया यांनी केला.

(वाचा - Airtel CEO चा इशारा, चुकूनही हे App डाउनलोड करू नका, अन्यथा...)

एअर इंडियावरही सायबर हल्ला -

21 मे रोजी एअर इंडियालाही एका मोठ्या सायबर हल्ल्यांचा (Cyber Attack) सामना करावा लागला होता. ज्यात क्रेडिट कार्डची माहिती आणि पासपोर्ट डिटेल्ससह प्रवाशांचे खासगी डिटेल्स चोरी झाले होते. एअर इंडियाच्या या डेटा ब्रीचमध्ये ऑगस्ट 2011 आणि फेब्रुवारी 2021 दरम्यानचा डेटा सामिल आहे.

First published:

Tags: Tech news