मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Airtel CEO चा इशारा, चुकूनही हे App डाउनलोड करू नका, अन्यथा...

Airtel CEO चा इशारा, चुकूनही हे App डाउनलोड करू नका, अन्यथा...

सध्या फसवणुकीचे प्रकार वाढले असून अशा गँग दररोज अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवत असल्याचे अनेक प्रकार समोर आल्याचं, एअरटेलचे सीईओ गोपाल यांनी सांगितलं.

सध्या फसवणुकीचे प्रकार वाढले असून अशा गँग दररोज अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवत असल्याचे अनेक प्रकार समोर आल्याचं, एअरटेलचे सीईओ गोपाल यांनी सांगितलं.

सध्या फसवणुकीचे प्रकार वाढले असून अशा गँग दररोज अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवत असल्याचे अनेक प्रकार समोर आल्याचं, एअरटेलचे सीईओ गोपाल यांनी सांगितलं.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 24 मे: टेलिकॉम कंपनी एअरटेलचे (Airtel) सीईओ गोपाल विट्टल (Airtel CEO Gopal Vittal) यांनी एअरटेल युजर्सला मोठा इशारा दिला आहे. कोरोना काळात प्रत्येक युजरला फसवणूकीपासून सावध राहणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. मार्केटमध्ये अनेक असे लोक आहेत, जे व्हिआयपी नंबरच्या नावाखाली युजर्सची फसवणूक करू शकतात. तसंच थर्डी पार्टी अ‍ॅप्सच्या मदतीनेही युजर्सचे अकाउंट डिटेल्स हॅक केले जाऊ शकतात. त्यामुळे ओटीपी कोणाशीही शेअर करू नका, कोणालाही याबबात माहिती देऊ नका.

सध्या फसवणुकीचे प्रकार वाढले असून अशा गँग दररोज अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवत असल्याचे अनेक प्रकार समोर आल्याचं, एअरटेलचे सीईओ गोपाल यांनी सांगितलं. फसवणूक करणाऱ्या फ्रॉडस्टर्सनी एअरटेलच्या काही युजर्सला त्यांचे KYC डिटेल्स पूर्ण करण्याचं सांगितलं. तसंच एअरटेल क्विकसपोर्ट हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवरुन (Google Play Store) डाउनलोड करण्याचंही सांगितलं.

जसं युजर्स या अ‍ॅपला इन्स्टॉल करतात, फसवणूक करणारी गँग टिमव्ह्यूवर क्विकसपोर्ट अ‍ॅपच्या मदतीने युजर्सच्या मोबाईलचा ताबा घेतात आणि युजर्सचे संपूर्ण डिटेल्स वापरुन अकाउंट खाली करतात. असे काही प्रकार समोर आल्यानंतर एअरटेल सीईओंनी, एअरटेल ग्राहकांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ते पुढे म्हणाले, एअरटेल युजर्सनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, की एअरटेल व्हिआयपी नंबर्स देत नाही आणि कोणतंही थर्ड पार्टी अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगत नाही. जर एखाद्या युजरसोबत असं काही झालं किंवा थर्ड पार्टी अ‍ॅप डाउनलोड करण्याबाबत सांगण्यात आलं, तर युजर्स 121 वर कॉल करुन कन्फर्म करू शकतात. कोरोना काळात देशात लॉकडाउन झालं आणि लोकांकडून ऑनलाईन ट्रान्झेक्शनच्या संख्येत वाढ झाली. तर दुसरीकडे सायबर फ्रॉडचीही (Cyber Fraud) प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली.

(वाचा - तुमचा फोन सुरक्षित ठेवण्यासाठी Google अकाऊंटमधून काढून टाका हे अ‍ॅप, अन्यथा...)

तसंच, युजर्सनी एअरटेल सेफ पे अ‍ॅप (Airtel safe pay) डाउनलोड करावं, जेणेकरुन एखादी फसवणूक करणारी गँग अशाप्रकारे काही काम करत असेल, तर ते त्वरित रोखलं जाऊ शकेल, असंही सीईओ गोपाल विट्टल यांनी सांगितलं.

सेफ पे युजर्स एअरटेल पेमेंट्स बँक अकाउंट्समधून अ‍ॅक्सेस करू शकतात. एअरटेल पेमेंट्स बँक अकाउंटमध्ये 1 लाख रुपयांपर्यंत लिमिट असते आणि हे कोणत्याही यूपीआय अ‍ॅपशी लिंक करता येतं.

First published:

Tags: Airtel, Online fraud, Tech news