मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /दिवाळीत iPhone घेण्याचा विचार करताय? खरेदीआधी या गोष्टी पाहाच, अशी होईल पैशांची बचत

दिवाळीत iPhone घेण्याचा विचार करताय? खरेदीआधी या गोष्टी पाहाच, अशी होईल पैशांची बचत

iPhone खरेदी करायचा असेल तर या महागड्या खरेदीआधी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

iPhone खरेदी करायचा असेल तर या महागड्या खरेदीआधी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

iPhone खरेदी करायचा असेल तर या महागड्या खरेदीआधी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : सध्या दिवाळी सेल सुरू असल्यानं अमेझॉन आणि फ्लिपकार्डवर स्मार्टफोन्सच्या खरेदीत मोठी सूट मिळत आहे. त्यामुळं जर तुम्हाला iPhone खरेदी करायचा असेल तर (iPhone offer  on Diwali sale) या महागड्या खरेदीआधी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

आता जर तुम्ही iPhone खरेदी करण्याचा (iphone online store) विचार करत असाल, तर त्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, कशा पद्धतीने Apple कंपनीच्या महागड्या स्मार्टफोन्सवरच्या खरेदीवर पैशांची बचत करता येईल. याबाबत माहिती असणं गरजेचं आहे.

बजेट किती आहे?

कोणताही स्मार्टफोन घेण्याआधी त्यासाठी आपलं किती बजेट आहे, हे तपासा. त्यानंतर असलेल्या बजेटमध्ये कोणता स्मार्टफोन खरेदी करता येईल हे पाहा. iPhone ची किंमत इतर स्मार्टफोनच्या तुलनेत अधिक असल्याने बजेट ठरवणं गरजेचं ठरतं.

या 6 गोष्टी लक्षात ठेवून करा Smart Shopping; फसव्या ऑफर्स, कर्जापासून राहाल दूर

iPhone खरेदी करण्याची वेळ -

स्मार्टफोनची किंमत काही दिवसांनी घसरते. अनेकदा iPhone च्या नव्या मॉडेलच्या लाँचनंतर आधीच्या जुन्या मॉडेलच्या किंमती कमी होतात. त्यामुळे iPhone घेताना त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याशिवाय दिवाळीत अनेक ऑफर्स दिल्या जातात. फेस्टिवल सीजनमुळे कोणत्या App आणि कोणत्या बँकेच्या कार्डवर ऑफर देण्यात येत आहेत, हे ही तपासायला हवं. यामुळे पैशांची मोठी बचत होऊ शकते.

स्मार्टफोनची साइज -

कोणताही iPhone खरेदी करताना त्याची साइज पाहायला हवी. iPhone 13 ची स्क्रिन साइज 6.7 इंची आहे. यात फीचर्स अतिशय जबरदस्त आहेत. मात्र मोठ्या साइजचा फोन हातात सांभाळणंही तितकंस सोपं नाही. त्यामुळे इतका महागडा फोन घेताना त्याची साइजही पाहणं महत्त्वाचं ठरतं

Charging नंतरही मोबाइल जास्त वेळ चालत नाही? असं वाढवा Battery लाइफ

तुम्हाला स्मार्टफोनमध्ये काय हवंय हे पाहा -

अनेकदा युजर्सला गेमिंगसाठी किंवा Video शूटिंगसाठी स्मार्टफोन्स हवे असतात. त्यासाठी स्मार्टफोनमध्ये मोठं स्टोरेज आणि चांगला बॅटरी बॅकअप असायला हवा. त्यामुळे आधी युजर्सला कोणत्या कामांसाठी स्मार्टफोन्सची गरज आहे, हे ओळखता आलं पाहिजे. फोनमध्ये तुमच्या आवडीचे, कामाचे किंवा हवे असलेले फीचर्स नसतील, तर त्यासाठी इतके पैसे मोजणं योग्य ठरणार नाही.

तुमचा Laptop अचानक Hang होतोय? या ट्रिक्स वापरुन करा सुपरफास्ट

वेगवेगळ्या शॉपिंग Websites वर ऑफर्स तपासा -

स्मार्टफोन खरेदी करताना संबंधित स्मार्टफोन्ससाठी कोणत्या शॉपिंग Websites वर चांगल्या ऑफर्स आहेत किंवा दोन वेबसाइटवरील स्मार्टफोनच्या किंमतीत किती अंतर आहे हे तपासायला हवं. त्यानंतर फोन खरेदी करणं सोपं जाईल.

First published:
top videos

    Tags: Apple, Diwali 2021, Diwali-celebrations, Iphone