मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

फोनमध्ये असा होतोय Ransomware अटॅक, हॅकर्सकडून डिव्हाइस लॉक करुन होतेय पैशांची मागणी

फोनमध्ये असा होतोय Ransomware अटॅक, हॅकर्सकडून डिव्हाइस लॉक करुन होतेय पैशांची मागणी

एका रिपोर्टनुसार, हॅकर्स सीनियर सिटीजन आणि मध्यमवयीन लोकांना टार्गेट करत असल्याचं समोर आलं आहे. हॅकर्स Ransomware अटॅकद्वारे अशा लोकांना निशाणा करत आहेत.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : इंटरनेटवर स्कॅमर्स, हॅकर्स सतत अॅक्टिव्ह असतात. आतापर्यंत अनेकांची मोठी ऑनलाईन फसवणूक झाली आहे. आता एका रिपोर्टनुसार, हॅकर्स सीनियर सिटीजन आणि मध्यमवयीन लोकांना टार्गेट करत असल्याचं समोर आलं आहे. हॅकर्स Ransomware अटॅकद्वारे अशा लोकांना निशाणा करत आहेत.

ग्लोबल रिपोर्टनुसार, लोकांना टार्गेट करण्यासाठी हॅकर्स Instagram आणि Tiktok सारख्या पॉप्युलर Apps चा वापर करत आहेत. सायबर सिक्योरिटी कंपनी Avast च्या रिसर्चरनुसार, हॅकर्स 65 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील आणि 25 ते 35 वयोगटातील लोकांना टार्गेट करत आहेत.

यापैकी विशेषकरुन अशा लोकांना टार्गेट केलं जातंय, जे लॅपटॉप किंवा कंप्यूटरवर ऑनलाईन येतात. या लोकांना Ransomware अटॅकद्वारे टार्गेट केलं जातं. तर मोबाइलवरुन सर्वाधिक ऑनलाईन येणाऱ्या वयोगटातील लोकांना मोबाइल बँकिंग Trojans, Adware, डाउनलोडर आणि FluBot SMS स्कॅमद्वारे टार्गेट केलं जात आहे.

Google चं नवं अपडेट, आता तुमचं अकाउंट अधिक सुरक्षित होणार; पाहा प्रोसेस

याबाबत न्यूज एजेन्सी IANS ने रिपोर्ट केलं आहे. Avast Threat Labs डेटानुसार, कंपनी जवळपास 1.46 मिलियन Ransomware अटॅक 2021 मध्ये प्रत्येक महिन्याला ब्लॉक करत आहे. FluBot अतिशय वेगात मोबाइलवर सर्वाधिक देशात पसरत आहे. यात भारताचाही समावेश आहे.

End-to-end encryption म्हणजे काय? वाचा कसे सुरक्षित राहतात WhatsApp Chats

हॅकर्स युजर्सच्या फोनमध्ये मॅलिशियस आणि इतर नको असलेले Apps इन्स्टॉल करतात. Instagram, Tiktok द्वारे युजर्सला मॅलिशियस लिंकवाला मेसेज पाठवला जातो. युजर्सने त्यावर क्लिक केल्यानंतर त्यांच्या फोनमध्ये मॅलिशियस Apps इन्स्टॉल होतात आणि हॅकर्स सहजपणे युजरचा फोन कंट्रोल करतात. Ransomware युजरच्या डिव्हाइसला इनफेक्ट करुन त्याचा कंट्रोल घेतो आणि त्याला लॉक करतो. डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी हॅकर्स पैशांची मागणी करतात.

First published:

Tags: Cyber crime, Online fraud, Tech news