जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp वर चुकूनही करू नका हे काम, कायमसाठी बॅन होईल अकाउंट

WhatsApp वर चुकूनही करू नका हे काम, कायमसाठी बॅन होईल अकाउंट

WhatsApp वर चुकूनही करू नका हे काम, कायमसाठी बॅन होईल अकाउंट

WhatsApp चे काही नियम आहेत, ते फॉलो न केल्यास तुमचं WhatsApp Account कायमसाठी बॅन होऊ शकतं. अनेकदा WhatsApp वर चुकून केलेली एखादी चूक महागत पडू शकते आणि WhatsApp Account थेट बॅन होऊ शकतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 5 एप्रिल : WhatsApp सर्वाधिक वापरला जाणारा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे कंपनी या App मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या कंटेंटबाबत अधिक सतर्क आहे. युजर्सच्या सुरक्षेसाठी सेफ्टी आणि इतर नवे फीचर्स सतत अपडेट केले जातात. WhatsApp चे काही नियम आहेत, ते फॉलो न केल्यास तुमचं WhatsApp Account कायमसाठी बॅन होऊ शकतं. अनेकदा WhatsApp वर चुकून केलेली एखादी चूक महागत पडू शकते आणि WhatsApp Account थेट बॅन होऊ शकतं. फेक न्यूज पसरण्यापासून रोखण्यासाठी व्हॉट्सअॅप युजर्सला एखाद्या गोष्टीबाबत रिपोर्ट करण्याचीही सुविधा देतं. तुमचं अकाउंट सेफ राहण्यासाठी, ते ब्लॉक न होण्यासाठी काही नियम फॉलो करणं गरजेचं ठरतं. Bloomberg च्या एका रिपोर्टनुसार, WhatsApp चा वापर सतत स्पॅम मेसेज पाठवण्यासाठी करू नये. ब्रॉडकास्टिंग लिस्ट किंवा ग्रुप क्रिएट करुन सतत मेसेज करणं स्पॅम कॅटेगरीमध्ये येतं. वेगवेगळ्या ग्रुपमध्ये फेक न्यूज पसरवल्यास युजरचं अकाउंट बॅन होऊ शकतं.

हे वाचा -  ट्रेन, बस किंवा इतर कुठेही तुमच्या बाजूला बसलेला व्यक्ती कधीच पाहू शकणार नाही तुमचं WhatsApp Chat, काय आहे ट्रिक

WhatsApp वर कधीही इतरांना APK फाइल फॉर्मेटमध्ये मालवेयर किंवा धोकादायक फिशिंग लिंक्स सेंड करू नये. तुम्ही एखाद्या नावाने फेक व्हॉट्सअॅप अकाउंट बनवलं असल्याचं कंपनीच्या लक्षात आल्यास त्यावेळीही तुमचं अकाउंट बंद केलं जाऊ शकतं. तसंच एखाद्याने थर्ड पार्टी व्हॉट्सअॅप WhatsApp Delta, GBWhatsApp, WhatsApp Plus चा वापर केल्यासही अकाउंट बॅन होऊ शकतं. WhatsApp वरुन एखाद्याला धमकी, निंदा, द्वेष पसरवणारे मेसेज केल्यास आणि त्या युजरने रिपोर्ट केल्यास तुमचं अकाउंट बॅन होऊ शकतं.

हे वाचा -  WhatsApp ची मोठी कारवाई! बॅन केले 14.26 लाख भारतीय युजर्सचे अकाउंट, काय आहे कारण?

दरम्यान, WhatsApp ने यावर्षी फेब्रुवारीदरम्यान 14.26 लाख भारतीय अकाउंट बंद केले (WhatsApp Account Banned) आहेत. अनेक तक्रारींनंतर WhatsApp ने हे पाऊल उचललं आहे. कंपनीने आपल्या मासिक रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. युजर्सकडून आलेल्या तक्रारी आणि त्यावर केलेल्या कारवाईसह या प्लॅटफॉर्मचा दुरोपयोग रोखण्यासाठी WhatsApp ने ही कारवाई केल्याचं सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात