जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp ची मोठी कारवाई! बॅन केले 14.26 लाख भारतीय युजर्सचे अकाउंट, काय आहे कारण?

WhatsApp ची मोठी कारवाई! बॅन केले 14.26 लाख भारतीय युजर्सचे अकाउंट, काय आहे कारण?

WhatsApp ची मोठी कारवाई! बॅन केले 14.26 लाख भारतीय युजर्सचे अकाउंट, काय आहे कारण?

WhatsApp ने यावर्षी फेब्रुवारीदरम्यान 14.26 लाख भारतीय अकाउंट बंद केले (WhatsApp Account Banned) आहेत. अनेक तक्रारींनंतर WhatsApp ने हे पाऊल उचललं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 4 एप्रिल : WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. परंतु अनेकदा यावर चुकून केलेली एखादी चूक महागत पडू शकते आणि WhatsApp Account थेट बॅन होऊ शकतं. WhatsApp ने यावर्षी फेब्रुवारीदरम्यान 14.26 लाख भारतीय अकाउंट बंद केले (WhatsApp Account Banned) आहेत. अनेक तक्रारींनंतर WhatsApp ने हे पाऊल उचललं आहे. कंपनीने आपल्या मासिक रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारीदरम्यान 335 भारतीय अकाउंटविरोधात तक्रारी मिळाल्या होत्या, ज्यात 194 खाती बंद करण्याचं अपील करण्यात आलं होतं. त्यापैकी 21 विरोधा कारवाई करण्यात आली आहे. कंपनीने नियमांचं उल्लंघन करण्यांना रोखण्यासाठी आणि त्यांचा शोध घेण्यासाठी तक्रार विभाग आणि त्यांच्या सिस्टमद्वारे आलेल्या तक्रारींच्या आधारे ही कारवाई केली गेली आहे.  युजर्सकडून आलेल्या तक्रारी आणि त्यावर केलेल्या कारवाईसह या प्लॅटफॉर्मचा दुरोपयोग रोखण्यासाठी WhatsApp ने ही कारवाई केल्याचं सांगितलं आहे. End-to-end encryption पॉलिसीमुळे युजर्सचे मेसेज पाहता येत नाहीत. अशात युजर्सची सुरक्षा लक्षात घेता अकाउंट्सकडून मिळणारे संकेत, एन्क्रिप्शनशिवाय काम करणारे फीचर्स आणि युजर्सकडून करण्यात आलेले रिपोर्ट्स या आधारावर निर्णय घेतला जातो. भारत सरकारने मे 2021 मध्ये नवे आयटी नियम सोशल मीडिया कंपन्यांना (Social Media) रेग्युलेट करण्यासाठी आणण्यात आले होते. नव्या आयटी नियमांनुसार (New IT Rules) सोशल मीडिया कंपन्यांना दर महिन्याला कम्प्लयान्स रिपोर्ट (Compliance Report) जारी करावा लागतो.

हे वाचा -  WhatsApp चं महिलांसाठी खास नवं अपडेट, एका मेसेजवर मिळेल आरोग्यासंबंधी कोणतीही माहिती

या गोष्टी करू नका - कोणी बेकायदेशीर, अश्लील, बदनामी करणारे, धमकी देणारे, त्रास देणारे, द्वेषपूर्ण भाषणं, वांशिक भेदभाव शेअर करत असेल, किंवा कोणत्याही बेकायदेशीर, अनुचित प्रथेला प्रोत्साहन देत असेल तर असे अकाउंट्स बॅन करण्यात येतील. त्याशिवाय WhatsApp च्या नियमांचं उल्लंघन केलं तरीही अकाउंट बॅन होऊ शकेल. त्यामुळे असा कोणताही कंटेट शेअर करू नका आणि तुमचं अकाउंट सुरक्षित ठेवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात