मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /ट्रेन, बस किंवा इतर कुठेही तुमच्या बाजूला बसलेला व्यक्ती कधीच पाहू शकणार नाही तुमचं WhatsApp Chat, काय आहे ट्रिक

ट्रेन, बस किंवा इतर कुठेही तुमच्या बाजूला बसलेला व्यक्ती कधीच पाहू शकणार नाही तुमचं WhatsApp Chat, काय आहे ट्रिक

आपण फोनमध्ये काय बघतोय हे बाजूला बसलेला किंवा मागे असलेला व्यक्ती आरामात बघतो. त्यांच्यापासून WhatsApp Chat किंवा आपण आपल्या फोनमध्ये काय बघतोय हे लपवण्यासाठी एक ट्रिक फायद्याची ठरेल.

आपण फोनमध्ये काय बघतोय हे बाजूला बसलेला किंवा मागे असलेला व्यक्ती आरामात बघतो. त्यांच्यापासून WhatsApp Chat किंवा आपण आपल्या फोनमध्ये काय बघतोय हे लपवण्यासाठी एक ट्रिक फायद्याची ठरेल.

आपण फोनमध्ये काय बघतोय हे बाजूला बसलेला किंवा मागे असलेला व्यक्ती आरामात बघतो. त्यांच्यापासून WhatsApp Chat किंवा आपण आपल्या फोनमध्ये काय बघतोय हे लपवण्यासाठी एक ट्रिक फायद्याची ठरेल.

नवी दिल्ली, 4 एप्रिल : WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. घर, गाडी, बस, ट्रेन कुठेही असलो तरी याचा वापर सुरूच असतो. अशावेळी बाजूला बसलेल्या व्यक्तीची आपल्या फोनवर, चॅटवरही नजर पडते. आपण फोनमध्ये काय बघतोय हे बाजूला बसलेला किंवा मागे असलेला व्यक्ती आरामात बघतो. त्यांच्यापासून WhatsApp Chat, आपल्या फोनमध्ये काय बघतोय हे लपवण्यासाठी एक ट्रिक फायद्याची ठरेल. यामुळे कोणीही तुमचे प्रायव्हेट मेसेज पाहू शकत नाही. या ट्रिकमुळे तुमच्या चॅटवर एक न दिसणारा पडदा टाकला जातो. या व्हर्चुअल पडद्याच्या मदतीने तुम्ही मेसेज पाहू शकता पण तुमच्या बाजूला मागे असलेला व्यक्ती मेसेज पाहू शकत नाही.

गुगल प्ले स्टोरवर (Google Play Store) यासाठी एक App आहे. हे MaskChat-Hides WhatsApp Chat युजर्स आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करू शकता. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी असताना तुमचं पर्सनल चॅटिंग कोणीही पाहू शकत नाही. या App मुळे व्हर्चुअल पडदा तयार होतो आणि स्क्रिन झाकली जाते, त्यामुळे तुमच्या बाजूला असलेला व्यक्तीही चॅट वाचू शकत नाही, चोरून पाहू शकत नाही.

हे App इन्स्टॉल केल्यानंतर युजर्सला स्क्रिनवर एक फ्लोटिंग मास्क चॅट आयकॉन दिसेल. तुम्हाला हवं त्यावेळी तुम्ही हा व्हर्चुअल पडदा टाकू शकता. हे पडदा लावण्यासाठी स्क्रिनवरचा फ्लोटिंग मास्क आयकॉन वरुन खाली असा ड्रॅग करावा लागेल.

हे वाचा - Oneplus Nord 2 मध्ये पुन्हा ब्लास्ट, फोनवर बोलता बोलता झाला स्फोट; यूजर जखमी

या App मध्ये ठराविक डार्कनेस असतो. हा डार्कनेस हवा तसा अॅडेस्टही करता येतो. व्हर्चुअल पडद्याच्या उजव्या बाजूला तीन लाइनवाला एक पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर त्यातील एक पर्याय निवडून व्हर्चुअल पडद्याचा ब्राइटनेस हवा तसा कंट्रोल करता येईल. बंद करण्यासाठी क्रॉस आयकॉनवर क्लिक करावं लागेल.

हे वाचा - सनी लिओनीसह राजकुमार रावसोबत पॅन कार्ड फ्रॉड; तुमच्या PAN Card चा चुकीचा वापर होत नाही ना? असं तपासा

MaskChat-Hides WhatsApp Chat चा वापर केवळ WhatsApp Chat चं नाही तर इतरही अनेक गोष्टींसाठी करता येईल. बँकिंग App मध्ये पासवर्ड टाकताना, फेसबुक मेसेंजरवर चॅट करताना किंवा आणखी कोणतीही प्रायव्हेट गोष्ट तुम्ही या App द्वारे प्रायव्हेटच ठेवू शकता.

First published:

Tags: Google, Mobile app, Tech news, Whatsapp chat, WhatsApp chats