नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर : Xiaomi च्या Diwali with Mi सेलमध्ये बंपर खरेदी सुरू आहे. 3 ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या या सेलचा शेवटचा दिवस 7 ऑक्टोबर आहे. ग्राहक या सेलमध्ये टीव्ही, फोन आणि इतर गॅजेट्सवर मोठी सूट मिळवू शकतात. Xiaomi India चे प्रमुख मनु कुमार जैन यांनी सांगितलं, की आतापर्यंत सेलमध्ये 20 लाख फोनची विक्री झाली आहे. म्हणजे केवळ 4 दिवसांत Xiaomi 20 लाख लोकांची पसंती ठरल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मनु कुमार जैन यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. यासाठी त्यांनी लोकांचे आभारही मानले आहेत. सेलमधील बॅनरनुसार, स्मार्टफोन्सवर तब्बल 19,000 रुपयांपर्यंतची सूट दिली जात असल्याचं समजतं आहे.
त्याशिवाय आणखी एक ऑफर फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. मनु जैन यांनी ट्विटमध्ये सांगितलं, की ग्राहकाने #DiwaliwithMi सह रिट्विट केल्यास, एका भाग्यवान विजेत्याला Mi Band 6 मिळेल. 1000 रिट्विटवर एक Mi Robot Vaccum आणि 2000 रिट्विटवर एक फ्लॅगशिप Mi 11X जिंकण्याची संधी मिळेल.
काय आहेत ऑफर्स -
- Xiaomi 11 lite NE 5G फोन 8750 रुपयांच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध केला जात आहे. या डिस्काउंटनंतर या लेटेस्ट फोनची किंमत 23,249 रुपये इतकी होते.
- Mi 11X फोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत उपलब्ध केला जात आहे. फोन 19,499 रुपयांत खरेदी करता येईल.
- Mi 11 Pro ग्राहक 18,999 रुपयांच्या सूटवर खरेदी करू शकतात. डिस्काउंटनंतर हा फोन 29,00 रुपये इतका होतो.
- Mi 11 Lite फोनवर एक्सचेंज ऑफर अंतर्गत 3500 रुपयांच्या एक्स्ट्रा सूट दिली जात आहे. सूटनंतर हा फोन 20,749 रुपयांत खरेदी करता येईल.
- Mi 10i वर एक्सचेंज ऑफर अंतर्गत 3500 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्यानंतर हा फोन 20,749 रुपयांत खरेदी करता येऊ शकेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Xiaomi, Xiaomi redmi