कोरोनाच्या संकटात Flipkart देतेय विद्यार्थ्यांना नोकरीची संधी, येथे करा अर्ज

कोरोनाच्या संकटात Flipkart देतेय विद्यार्थ्यांना नोकरीची संधी, येथे करा अर्ज

एका इंटर्नशिप प्रोग्रामद्वारे विद्यार्थ्यांना Flipkart काम करण्याची संधी देत आहे. ही इंटर्नशिप 45 दिवसांची असेल. या इंटर्नशिप दरम्यान कोरोना व्हायरसच्या संपूर्ण गाईडलाईन्सचं पूर्णपणे पालन करण्यात येणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : आता विद्यार्थ्यांना ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. एका इंटर्नशिप प्रोग्रामद्वारे विद्यार्थ्यांना Flipkart काम करण्याची संधी देत आहे. ही इंटर्नशिप 45 दिवसांची असेल. कंपनीने या इंटर्नशिप प्रोग्रामला लॉन्चपॅड (Launchpad) असं नाव दिलं आहे. ही इंटर्नशिप पेड इंटर्नशिप असणार आहे. म्हणजेच या इंटर्नशिप दरम्यान विद्यार्थ्यांना वेतनही दिलं जाणार आहे. दरदिवशी विद्यार्थ्यांना 500 रुपयांपर्यंत वेतन दिलं जाणार आहे.

Flipkartकडून सप्लाय चेन डिपार्टमेंटमध्ये, विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. कंपनीने आगामी फेस्टिव्ह सीजन पाहता Big Billion Days sale साठी हा इंटर्नशिप प्रोग्राम लॉन्च केला आहे.

वाचा - आता तुम्हाला 1 रुपयाचं नाणं करणार लखपती, घरबसल्या कमावू शकता 25 लाख

फ्लिपकार्टने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रोग्राम विविध आवश्यक सप्लाय चेन भूमिकांमध्ये, भारतातील भविष्यातील कर्मचाऱ्यांसाठी डिजाईन करण्यात आला आहे. जो दिर्घ काळासाठी योग्य, प्रशिक्षित आणि कुशल व्यवसायिकांना तयार करण्यास मदत करेल.

वाचा - 44 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरावाला Vivo V20 स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

वरिष्ठ उपाध्यक्ष अमितेश झा यांनी सांगितलं की, येणाऱ्या सणासुदीच्या काळात विद्यार्थ्यांना यात काम करण्याचा अनुभव मिळेल. या इंटर्नशिप प्रोग्रामवेळी कोरोना व्हायरसच्या संपूर्ण गाईडलाईन्सचं पूर्णपणे पालन करण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासह विद्यार्थ्यांना हँड सॅनिटायजर आणि आरोग्य सेतू ऍप ठेवणं आवश्यक असणार आहे. गेल्या वर्षी जवळपास 2000 विद्यार्थ्यांनी Flipkart इंटर्नशिप प्रोग्राममध्ये भाग घेतला होता.

वाचा - जगात भारी कोल्हापुरी! ऑनलाईन दुकानात आता घरबसल्या मिळणार अस्सल कोल्हापुरी चप्पल

Published by: Karishma Bhurke
First published: October 13, 2020, 2:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading