नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : काही लोकांना जुनी नाणी, नोटा जमा करण्याचा छंद असतो. हा छंद एखाद्याला लखपतीही बनवू शकतो. अनेक जण विविध प्रकारच्या अँटिक गोष्टींचं कलेक्शन करत असतात. या अशा प्रकारच्या छंदांतून मोठी कमाईही होते. जर तुम्हाला जुनी नाणी गोळा करण्याचा छंद असेल, तर 1913 मध्ये बनलेलं 1 रुपयाचं नाणं आहे का, ते आवश्यक तपासा. जर हे नाणं असेल, तर घरबसल्या तब्बल 25 लाख रुपयांची कमाई होऊ शकते.
अनेक अँटिक वस्तूंचा लिलाव होत असतो. लिलावात अशा दुर्मिळ वस्तूंना मोठी किंमतही मिळते. जुन्या काळात सोन्या-चांदीची नाणी होती. राजा-महाराजा ही सोन्या-चांदीची नाणी बक्षीस म्हणून वाटायचे. पण हे 1 रुपयांचं नाणं सरकारकडून बनवण्यात आलं होतं. 1913 मध्ये लोक याचा वापर करायचे. हे चांदीपासून बनवण्यात आलं होतं. आता या नाण्याला विक्टेरियन कॅटेगरीमध्ये सामिल करण्यात आलं आहे. त्यामुळे या नाण्याची किंमत वाढली आहे. हे नाणं अतिशय दुर्मिळ आहे. हे नाणं विकल्यास 25 लाख रुपये मिळणार असल्याची माहिती आहे.
जर तुमच्याकडे 1913 मधील हे दुर्मिळ 1 रुपयाचं नाणं असेल, तर ते इंडियामार्टच्या वेबसाईटवर विकता येणार आहे. त्यासाठी साईटवर तुमचं अकाउंट बनवावं लागेल. अकाउंट बनल्यानंतर तुम्हाला सेलर म्हणून रजिस्टर करावं लागेल. रिजस्टर्ड झाल्यानंतर नाण्याचे फोटो अपलोड करून ते सेलसाठी ठेवता येणार आहे.
अनेकांना दुर्मिळ, अँटिक वस्तू जमा करण्याचा छंद असतो. अँटिक वस्तूंच्या, दुर्मिळ वस्तूंच्या लिलावात चांगली रक्कम कमावता येते. अशा वस्तूंची कमी असल्याने याला चांगल्या किंमतीत खरेदी केलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.