गायीच्या शेणापासून बनवलेली चीप लॉन्च; मोबाईल राहणार रेडिएशन फ्री

गायीच्या शेणापासून बनवलेली चीप लॉन्च; मोबाईल राहणार रेडिएशन फ्री

या चीपमुळे मोबाईल हँडसेटचं रेडिएशन मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : राष्ट्रीय कामधेनु आयोगाने (Rashtriya Kamdhenu Aayog) यावर्षी दिवाळीमध्ये 'कामधेनु दिवाळी अभियान' सरू केलं आहे. या अभियानांतर्गत दिवाळी दरम्यान, गायीच्या शेणापासून बनलेल्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यावर्षी दिवाळीमध्ये गायीच्या शेणापासून दिवे, मेणबत्ती, धूप, अगरबत्ती, वॉल-पीस, शुभ-लाभ, स्वस्तिक, पेपर-वेट, हवन सामग्री, गणपती आणि लक्ष्मी देवीची मूर्ती बनवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

राष्ट्रीय कामधेनु आयोगाने गायीच्या शेणापासून बनलेली चीप (Cow Dung Chip) लॉन्च केली आहे. आयोगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या चीपमुळे मोबाईल हँडसेटचं रेडिएशन मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. मोबाईलसोबत ही चीप ठेवल्यानंतर रेडिएशन मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं, आम्ही पाहिलं, असं आयोगाचे अध्यक्ष वल्लभ भाई कथीरिया यांनी पत्रपरिषदेत सांगितलं. या चीपशिवाय, कामधेनु आयोगाने गायीच्या शेणापासून बनलेल्या इतरही अनेक वस्तू यावेळी लॉन्च केल्या. वल्लभ भाई कथीरिया यांनी यावेळी शेणापासून बनलेले दिवे, शुभ-लाभ आणि चीपही दाखवली. दिवाळीत प्रदूषण कमी करणं, हा यामागचा उद्देश असल्याची माहिती देण्यात आली.

वाचा - आता तुम्हाला 1 रुपयाचं नाणं करणार लखपती, घरबसल्या कमावू शकता 25 लाख

फोटो सौजन्य : PIB

यंदाच्या दिवाळीत 11 कोटी कुटुंबांमध्ये गायीच्या शेणापासून बनवलेले, 33 कोटी दिवे लावण्याचं राष्ट्रीय कामधेनु आयोगाचं लक्ष्य आहे. यापैकी 3 लाख दिवे केवळ एकट्या अयोध्येत प्रज्वलित केले जाणार आहेत. तर 1 लाख दिवे वारासणीत लावले जाणार आहेत.

वाचा - कोरोनाच्या संकटात Flipkart देतेय विद्यार्थ्यांना नोकरीची संधी, येथे करा अर्ज

मोठ्या संख्येने रोजगाराची संधी -

राष्ट्रीय कामधेनु आयोगाच्या या प्रयत्नांमुळे अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. गाय पाळणारे हजारो शेतकरी, महिला उद्योजक आणि इतर लहान-मोठ्या उद्योगांना काम मिळणार असून व्यवसायाची संधी निर्माण होणार आहे. गोशाळा आत्मनिर्भर बनवण्यामध्येही याची मदत होणार आहे. या वस्तूंमुळे सणासुदीच्या काळात चीनी वस्तूंवर अवलंबून राहणाऱ्या लोकांमध्येही घट होण्याची शक्यता आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: October 13, 2020, 4:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading