मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Google ने या App ला Play Store वर केलं बॅन; तुमच्याही फोनमध्ये असेल तर लगेच करा डिलीट

Google ने या App ला Play Store वर केलं बॅन; तुमच्याही फोनमध्ये असेल तर लगेच करा डिलीट

क्रिप्टोकरन्सी लिंक्ड अ‍ॅप Google Play Store वर बॅन करण्यात आलं आहे. तुम्हीही हे अ‍ॅप फोनमध्ये डाउनलोड केलं असेल, तर डिलीट करणं गरजेचं आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : Google ने असं App बॅन केलं आहे, जे आतापर्यंत अनेकांनी डाउनलोड केलं आहे. हे बॅन अ‍ॅप Google Play Store वर पैसे कमावण्याच्या दृष्टीने अनेकांनी डाउनलोड केलं होतं. गुगल प्ले स्टोरवर (Google Play store) असे अनेक अ‍ॅप्स अपलोड होत आहेत, जे युजर्सचा डेटा आणि पैसा चोरी करण्याचं काम करत आहेत. Google कडून वेळोवेळी कारवाई करत धोकादायक अ‍ॅप बॅन केले जातात. आता असंच क्रिप्टोकरन्सी लिंक्ड अ‍ॅप Google Play Store वर बॅन करण्यात आलं आहे. तुम्हीही हे अ‍ॅप फोनमध्ये डाउनलोड केलं असेल, तर डिलीट करणं गरजेचं आहे.

क्रिप्टोकरंसीतून मोठी रक्कम मिळवण्याचा उद्देश ठेवणाऱ्या लोकांना या धोकादायक अ‍ॅपद्वारे गंडा घातला जात होता. जेव्हापासून टेस्लाचे सीईओ एलन मस्क आणि ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी यांनी क्रिप्टोकरंसीबाबत खुलेपणाने बोलण्यात सुरुवात केली आहे, तेव्हापासून क्रिप्टोकरंसी आणि ब्लॉकचेनमध्ये लोकांची आवड अधिक वाढली आहे.

अनेकांची यात आवड निर्माण झाल्याचा फायदा हॅकर्सकडून घेतला जात आहे. धोकादायक अ‍ॅपद्वारे युजर्सकडून स्मार्टफोनवर अ‍ॅडवेअर आणि मालवेअर डाउनलोड केले जातात. हे हॅकर्स छोट्या गुंतवणुकीच्या बदल्यात मोठी रक्कम मिळवण्याचा दावा करतात. परंतु अशा युजर्सला यात एकदा पैसे गुंतवल्यानंतर ते परत मिळत नाहीत. अशाप्रकारच्या धोकादायक अ‍ॅपमुळे अनेकांचे पैसे डुबले आहेत. Daily Bitcoin rewards cloud (डेली बिटकॉइन रिवॉर्ड्स क्लाउड) असं हे अ‍ॅप होतं. मोठी फी घेऊन यात लोकांची फसवणूक केली जात होती.

11 रुपयांचा हा रिचार्ज करताना सावधान, फोन Hack होण्याचा धोका

सिक्योरिटी फर्म Trend Micro ने क्रिप्टोकरंसी मायनिंग करणाऱ्या अ‍ॅप्सवर अभ्यास केला होता. त्यांच्या रिपोर्टनुसार, अनेक अ‍ॅप्स क्रिप्टोकरंसी मायनिंगच्या नावाने युजर्सची फसवणूक करत होते. त्यांच्या रिपोर्टनंतर गुगलने अनेक अ‍ॅप्स आपल्या गुगल प्ले स्टोरवरुन हटवले आहेत.

First published:

Tags: Cyber crime, Online fraud, Tech news, Techonology