मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /11 रुपयांचा हा रिचार्ज करताना सावधान, फोन Hack होण्याचा धोका

11 रुपयांचा हा रिचार्ज करताना सावधान, फोन Hack होण्याचा धोका

ठाण्यात राहणाऱ्या एका वृद्धासोबत ऑनलाईन फ्रॉड झाला आहे. सिम कार्ड ब्लॉक होण्याचं सांगत 6 लाख 25 हजार रुपयांचा फ्रॉड करण्यात आला आहे.

ठाण्यात राहणाऱ्या एका वृद्धासोबत ऑनलाईन फ्रॉड झाला आहे. सिम कार्ड ब्लॉक होण्याचं सांगत 6 लाख 25 हजार रुपयांचा फ्रॉड करण्यात आला आहे.

ठाण्यात राहणाऱ्या एका वृद्धासोबत ऑनलाईन फ्रॉड झाला आहे. सिम कार्ड ब्लॉक होण्याचं सांगत 6 लाख 25 हजार रुपयांचा फ्रॉड करण्यात आला आहे.

ठाणे, 14 सप्टेंबर : सायबर फ्रॉडमध्ये (Cyber Fraud) वाढ झाल्याने प्रत्येकवेळी सावधगिरी बाळगणं गरजेचं ठरतं आहे. जरासा बेजबाबदारपणा झाला, तरी मोठी फसवणूक होवू शकते. असंच एक प्रकरण ठाणे जिल्ह्यात समोर आलं आहे. ठाण्यात राहणाऱ्या एका वृद्धासोबत ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud) झाला आहे. सिम कार्ड ब्लॉक होण्याचं सांगत 6 लाख 25 हजार रुपयांचा फ्रॉड करण्यात आला. आता याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या व्यक्तीला टेलिकॉम कंपनीतून बोलत असल्याचा कॉल आला. त्या टेलिकॉम कंपनीचं सिम ते व्यक्ती वापरत असून त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना असल्याचं सांगण्यात आलं. त्यांना जराही कल्पना नव्हती, की त्यांच्यासोबत हा फ्रॉड होवू शकतो. 'तुमचं सिम कार्ड लवकरच बंद होवू शकतं, कारण याचं वेरिफिकेशन झालेलं नाही. जर तुम्ही उद्यापर्यंत एका दिवसांत वेरिफिकेशन केलं नाही, तर तुमचं सिम कायमचं बंद होईल' असं त्यांना फ्रॉडस्टर्सकडून सांगण्यात आलं. त्यांनादेखील खरंच त्यांचं सिम बंद होईल असं वाटलं.

त्या व्यक्तीने मी स्वत: जावून वेरिफिकेशन करेन असं सांगितलं. यावेळी फ्रॉड करणाऱ्यांनी त्यांना तुम्हाला वेरिफिकेशनसाठी कुठेही जाण्याची गरज नसल्याचं म्हटलं. तुम्हाला लिंक पाठवली जाईल, त्यावर क्लिक करुन केवळ 11 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. त्यानंतर वेरिफिकेशन पूर्ण होईल, असं त्यांना सांगण्यात आलं. बाहेर जाण्यापेक्षा घरातच बसून हे काम होत असल्याने त्यांनीही हे मान्य केलं.

फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना एक लिंक पाठवली. त्यांनी लिंक ओपन केली, परंतु त्याद्वारे पेमेंट करता आलं नाही. त्यानंतर त्यांना आणखी एक लिंक पाठवली गेली. ही लिंक ओपन केल्यानंतर त्या व्यक्तीच्या फोनचं नियंत्रण फ्रॉड करणाऱ्यांकडे गेलं. लगेच त्यांच्या अकाउंटमधून 6 लाख 25 हजार रुपये उडाले, त्यावेळी इतकी मोठी रक्कम एका क्षणात उडाल्याने त्यांना ही मदत नसून फ्रॉड झाल्याचं समजलं.

BSNL अलर्ट-

BSNL ने दोन दिवस आधीच आपल्या युजर्सला अलर्ट मेसेज पाठवला होता. या मेसेजमध्ये फसवणुकीपासून सावध राहण्याचं सांगितलं. कोणीही वेरिफिकेशनसाठी कोणताही नंबर डायल करण्यासाठी सांगितला किंवा कोणतीही लिंक ओपन करण्यास किंवा अॅप डाउनलोड करण्यास सांगितल्यास अलर्ट होणं गरजेचं आहे. कोणीही आधार कार्डचे डिटेल्स मागितल्यास देऊ नका. BSNL कधीही अशाप्रकारची खासगी माहिती ग्राहकांकडे मागत नाही. BSNL शिवाय इतरही नेटवर्क कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना अशा फ्रॉडपासून सावधानतेचा इशारा दिला आहे.

First published:
top videos