नवी दिल्ली, 6 एप्रिल: जर तुम्ही सध्याच्या ऑनलाईन पेमेंट अॅप्सने (Payment Apps) खुश नसाल, तर आता चिंता करण्याची गरज नाही. भारतीय बाजारात डिजिटल पेमेंटला (Digital Payment) प्रोत्साहन देण्यासाठी एक नवं अॅप लाँच होणार आहे. कंपनीने भारतीय पेमेंट मार्केटमध्ये येण्याची तयारी केली आहे.
OnePlus आणतंय नवं पेमेंट अॅप -
telecomtalk च्या रिपोर्टनुसार, चिनी मोबाईल निर्माता कंपनी OnePlus लवकरच भारतीय बाजारात एक पेमेंट अॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्टनुसार, कंपनीने डिजिटल पेमेंट बाजारात येण्याची पूर्ण तयारी केली असल्याचं म्हटलं आहे.
भारतात नवं पेमेंट अॅप लाँच करण्यापूर्वी OnePlus च्या एका खास ट्रेडमार्क फीचरची मोठी चर्चा आहे. कंपनीने आपल्या ऑपरेटिंग सिस्टम OxygenOS मध्ये या नव्या फीचरसाठी अर्ज केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, OnePlus ला नवा ट्रेडमार्क मिळाला आहे.
OnePlus Pay -
OnePlus च्या नव्या पेमेंट अॅपचं नाव OnePlus Pay असेल. हे पेमेंट अॅप सध्या बाजारात असलेल्या Google Pay, Paytm, PhonePe आणि WhatsApp Payment सारख्या अॅप्सला चांगलीच टक्कर देईल असं बोललं जात आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, OnePlus चं नवं पेमेंट अॅप या महिन्यात सुरू होऊ शकतं. मात्र कंपनीने या अॅपबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे, चिनी मोबाईल निर्माता कंपनी OnePlus भारतात जवळपास सर्वच सेगमेंटमध्ये उतरण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीच्या काही वर्षात कंपनीने भारतात स्मार्टफोन्स, आता स्मार्ट टीव्ही आणि स्मार्ट वॉचही कंपनीने बाजारात आणलं आहेत. आता कंपनी ऑनलाईन पेमेंट अॅप सुविधा सुरू करुन आणखी एक सेगमेंट भारतात आणत आहे. OnePlus Pay भलेही भारतात नवीन अॅप असेल, परंतु कंपनी चिनमध्ये आधीपासूनच या ऑनलाईन पेमेंट अॅपची सेवा देत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Digital services, Oneplus, Online payments, Payment, Paytm, Tech news, Upi